शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

योग्य दिशेने जाणारा मात्र संभ्रमात टाकणारा अर्थसंकल्प - अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:29 PM

जळगावात पीपल्स बँक व सॅटर्डे क्लबतर्फे ‘अर्थसंकल्प २०१८-अर्थ आणि अन्वयार्थ’वर व्याख्यान

ठळक मुद्देमोदी सरकारची अर्थकारणाची परंपरा वेगळी...म्हणून इंधन, मद्यावर जीएसटी नाहीअर्थकारणाच्या चाब्या नव्या पिढीकडे

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ७ - यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे योग्य दिशेने जाणारा, मध्येच अनेक ठिकणारा थांबणारा आणि संभ्रमात टाकणारा असा अर्थसंकल्प असल्याचे विश्लेषण अर्थतज्ज्ञ व प्रसिद्ध वक्ते चंद्रशेखर टिळक यांनी केले.जळगाव पीपल्स मल्टीस्टेट शेड्यूल बँक व सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जळगाव शाखा यांच्या संयुक्तविद्यमाने मंगळवारी संध्याकाळी गंधे सभागृहात ‘अर्थसंकल्प २०१८-अर्थ आणि अन्वयार्थ’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष श्रीधर इनामदार, सचिव विनित जोशी, अभिजित पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीधर पाटील यांनी केले.मोदी सरकारची अर्थकारणाची परंपरा वेगळीमोदी सरकारचा हा चौथा अर्थसंकल्पदेखील अर्थसंकल्पाबाहेर घोषणा करायच्या आणि अर्थसंकल्प केवळ नियमित पद्धतीने सादर करायचा अशा पारंपारिक शैलीतीलच असल्याचे सांगून आयुष्यमान, आॅपरेशन ग्रीन यासारख्या योजनांसाठी पुरेशा तरतुदी आहेत का? अशी शंका व्यक्त करून त्यातील अप्रत्यक्ष मार्गही सांगितले. नोटाबंदी, जीएसटी, रेरा यासारख्या गोष्टींचाही या अर्थसंकल्पावर परिणाम जाणवतो. तसाच तो शेअर बाजारावरही जाणवला. अपेक्षा वाढवून ठेवल्यामुळेही पदरी काही वेळेस निराशा येते. ती या अर्थसंकल्पनामुळेही झाली, असे ते म्हणाले.अर्थकारणाच्या चाब्या नव्या पिढीकडेतरुणाई अर्थात वयाच्या ३५ वर्षाखालील युवकांची जीवन शैली, उत्पन्न शैली, गुंतवणूक शैलीदेखील सरकारने या अर्थसंकल्पात प्रामुख्याने विचारात घेतली आहे. कारण या वयोगटाच्या ‘सर्व्हिस इंडस्ट्री’मधून जीडीपीमध्ये ५४ टक्के वाटा येत आहे. त्यामुळे आता चाब्या नव्या पिढीकडे गेल्या आहेत. कृषी, उद्योग, सेवा ही वेगवेगळी क्षेत्र आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करणाºयांना ‘लॉग टर्म्स कॅपीटल गेन टॅक्स’ भरावा लागेल का? आणि त्यातून किती उत्पन्न मिळेल या विषयीही त्यांनी माहिती दिली. हा अर्थसंकल्प शब्दात नाही तर सूचक पद्धतीने अनेक गोष्टी सांगणारा आहे. अर्थसंकल्प म्हणजे आर्थिक राजकारण किंवा राजकीय अर्थकारण असेही म्हणू शकतात, असे त्यांनी सांगितले.कृषी क्षेत्राची गणिते वेगळीकृषी क्षेत्रातील गणिते वेगळी असून त्या विषयी माहिती देताना या क्षेत्राचे धोरण केंद्र सरकार ठरवते तर अंमलबजावणी राज्य सरकार करते. असे सांगून शेवटी राजकारण विरहीत भूमिका घेतली तर या अर्थसंकल्पावर कोणतीही टिका करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर श्रोत्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.क्लटर इकॉनॉमीकडून क्लस्टर इकॉनॉमीकडेक्लटर ‘इकोनॉमी कडून क्लस्टर इकोनॉमी’कडे घेवून जाणार हा अर्थसंकल्प असल्यामुळे यामध्ये निर्णय घेताना सर्वसमान्यांचा गोंधळ निर्माण होत असल्याचे टिळक या वेळी म्हणाले....म्हणून इंधन, मद्यावर जीएसटी नाहीपेट्रोल, डिझेल, मद्य यावर अद्यापही जीएसटी लागू करण्यात आलेली नाही. कारण नोटाबंदीनंतर इंधनासाठी बंद केलेल्या नोटा स्वीकारल्या जात होत्या, त्याचवेळी सरकारने ओळखले आपण इंधनाचा किती वापर करतो. त्यामुळे त्याचे दर कितीही वाढविले तरी त्याचा वापर जनता करणारच आहे, हे ओळखून त्यावर जीएसटी लावली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भालचंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिन दुनाखे यांनी केले तर तर विनित जोशी यांनी आभार मानले.

टॅग्स :JalgaonजळगावBudget 2018अर्थसंकल्प २०१८