लोकमत न्युज नेटवर्क
कजगाव, ता.भडगाव : कजगाव परिसरात केळी व कापसाचे चांगले उत्पादन घेण्यात येते. केळीसाठी हा भाग प्रसिद्ध असून कापसाचीदेखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या वर्षी तुरळक शेतकऱ्यांचे कापूस वेचणीस प्रारंभ झाला. वेचलेला कापूस शुक्रवारी कजगाव येथील व्यापाऱ्यांकडे आणला असता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ७०११ चा भाव या वेळी व्यापाऱ्याकडून देण्यात आला.
कजगावचा धक्का जसा केळीकरिता प्रसिद्ध त्याच पद्धतीने येथे कापसाचीदेखील उलाढाल मोठ्या प्रमाणात होते.
ज्या पद्धतीने केळीच्या गाड्या दिल्ली मुंबईसह देशभरात जातात त्याचप्रमाणे
कजगाव येथून कजगाव परिसरातील पन्नास खेड्यावरील कापूस हा गुजरात जातो. यामुळे मोठी उलाढाल कापसाच्या माध्यमातून होते. १० रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर येथील कापसाचे प्रसिद्ध व्यापारी पप्पुशेठ वाणी यांनी ७०११ रुपये भाव देत कापूस खरेदीचा शुभारंभ केला. प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
कजगावात कापूस खरेदी शुभारंभप्रसंगी उपस्थित शेतकरी ११/७