जळगाव : सर्व शक्ती सेनेचे राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे यांच्या हस्ते नुकतेच रमजान ईदनिमित्त ताबापुरा व हारिविठ्ठल नगर येथे शिरखुर्मा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. सुनील तायडे, महेंद्र सुरवाडे, कृष्णा सावळे, सचिन सुरवाडे, प्रज्ञारत्न मोरे, सुनील ठाकरे, श्रीरंग सुरवाडे, सकावत शाह, शिकदर तडवी, रमजान तडवी, आरिफ शेख, शकील शेख, कृष्णा सावळे, प्रा. साबीर शेख उपस्थित होते.
हजरत बिलालतर्फे कपडे वाटप
जळगाव : हजरत बिलालतर्फे रमजान ईद व अक्षय तृतीयेनिमित्त शिवाजीनगर येथे नागरिकांना आंबे, कपडे व शिरखुर्माचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सैय्यद अकिल पहेलवान, अकिल इस्माईल, प्रा. रफिक शेख, मजिद शेठ, मसूद खान, फिरोज पठाण, सैय्यद अकिल पहेलवान, आदी समाज बांधव उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य वाटप
जळगाव : श्री इच्छापूर्ती गणेश व महादेव मंदिरातर्फे शहरातील विविध भागातील दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी अध्यक्ष शाम कोगटा, मनोज चौधरी, योगेश जाधव, पवन ठाकूर, अजय साळुंखे, गणेश गायकवाड, कुणाल बडगुजर, रोहित कोगटा, विजू बारी, केतन बारी, विलास बारी यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, मंदिर प्रशासनातर्फे लॉकडाऊनच्या काळात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
नवीन बसस्थानकातील पाणपोई अद्यापही बंदच
जळगाव : शहरातील एका सामाजिक संस्थेने गेल्या वर्षी नवीन बसस्थानकात बसविलेली पाणपोई वर्षभरातच बंद पडली आहे. थंड पाण्याची सोय असलेली ही पाणपोई संबंधित सामाजिक संस्थेने लक्ष न दिल्यामुळे बंद पडली असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, सध्या संचारबंदीत स्थानकावर प्रवाशांची संख्या कमी असली तरी, येथील कर्मचाऱ्यांना मात्र ही पाणपोई बंद असल्यामुळे दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे.
बिबानगर येथे कमी दाबाने वीज पुरवठा
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून बिबानगर येथे अनेक ठिकाणी कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याचा प्रकार घडत आहे. यामुळे घरातील उपकरणे पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या उन्हाळ्यात यामुळे नागरिकांना अधिकच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
दूध फेडरेशन कडील रस्त्यांची दुरवस्था
जळगाव : सूरत रेल्वे गेटकडून दूध फेडरेशनकडे जणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर वाहनधारकांचे अधीकच हाल होत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.