बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील जलचक्र खुर्द व परिसरात तासन्तास वीजपुरवठा खंडित राहात असल्याने संतप्त जि. प.सदस्य पती, सरपंच व ५० च्यावर ग्रामस्थांनी बोदवड येथे वीज वितरण कंपनीचे उपअभियंता दीपक राठोड यांना तहसीलदार कार्यालयाबाहेर घेराव घातला.सूत्रांनुसार, तालुक्यातील जलचक्र खुर्द गावात मुक्तळ वीज उपकेंद्रावरून वीजपुरवठा होतो, परंतु गत आठ दिवसांपासून या गावतील वीजपुरवठा रात्री खंडित होतो. ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागते.दरम्यान, दिवसा (सिंगल फेज) कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असल्याने, शेतातील वीज पंप बंद पडतात. जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. शेतकऱ्यांना शेतात पिकांना देण्यासाठी पाणी मिळत नाही.जि.प.सदस्यांकडे कैफीयतलोकांनी याबाबतची कैफियत जि.प. सदस्या वर्षा रामदास पाटील यांच्याकडे मांडली. त्यांनी वीज वितरण कंपनीशी संपर्क साधला असता त्यांचीही दखल घेतली गेली नाही.ग्रामस्थ संतप्तदरम्यान, २८ जून रोजी सकाळी ११.३० वा. जि.प. सदस्य यांचे पती व बाजार समिती संचालक रामदास पाटील, जलचक्र खुर्दचे सरपंच पंढरी दोधू शिराळे, ग्रामस्थ मयूर पाटील, ईश्वर गोसावी, विकास पाटील, धनराज पाटील, सुशील सुरवाडे, गजानन पाटील, संजय पाटील, भूषण गवळी, कौतिक पाटील, बाळू पाटील उमेश पाटील आदीसह पन्नासच्यावर ग्रामस्थांनी बोदवड तहसीलदार रवींद्र जोगी यांना निवेदन देऊन दिल. या दरम्यान, रामदास पाटील व सरपंच शिराळे वीज वितरण कार्यलय गाठत असताना तहसीलदार जोगी यांनी त्यांना थांबवून वीज वितरण कंपनीचे उपसहायक अभियंता दीपक राठोड यांना तहसीलदार कार्यालयात बोलावून घेतले.कार्यालयाबाहेर घातला घेरावदीपक राठोड तहसीलदार कार्यलयात येत असताना त्यांना बाहेरच ग्रामस्थांनी अडवत घेराव घातला. इतर सर्व गावांना सुरळीत वीज पुरवठा मुक्तळ उपकेंद्र वरून होत असताना आमच्याच गावात हा त्रास कशाला असा सवाल उपस्थित करुन संताप व्यक्त केला. जोगी यांच्या कार्यालयात बैठक झाली. मुक्तळ उपकेंद्राच कनिष्ठ अभियंता पद रिक्त आहे. शेलवड केंद्राचे कनिष्ठ अभियंता कुलकर्णी काम पाहत आहेत. तहसीलदार यांनी त्यांच्याशी संवाद साधत वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे कारण विचारले. ३३ केव्हीच्या केंद्रात पावसामुळे अडचण येत असल्याचे सांगत वरिष्ठांना पत्र देऊन समस्या सोडवण्याचे सांगितले. आज समस्या न सुटल्यास आता आम्ही आमच्या परीने आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी तहसीदारांसमोर राठोड यांना दिला व निवेदन देऊन माघारी फिरले.पदाधिकारी व शासकीय नोकर जनतेचे सेवकबाजार समिती संचालक रामदास पाटील यांनी दीपक राठोड यांना ‘तुम्ही आमच्यासारख्यांना अशी वागणूक देतात तर सामान्य जनतेचे काय?’ असे सांगत तुम्ही पगारदार आहात, आम्ही बिनपगारी आहोत. मात्र दोन्ही जनतेचे सेवक आहेत, हे लक्षात असू द्या, असे सांगत खडसावले.
बोदवड येथे वीज अभियंत्यास घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 8:01 PM
बोदवड तालुक्यातील जलचक्र खुर्द व परिसरात तासन्तास वीजपुरवठा खंडित राहात असल्याने संतप्त जि. प.सदस्य पती, सरपंच व ५० च्यावर ग्रामस्थांनी बोदवड येथे वीज वितरण कंपनीचे उपअभियंता दीपक राठोड यांना तहसीलदार कार्यालयाबाहेर घेराव घातला.
ठळक मुद्देबोदवड शहरासह तालुक्यात खंडित वीजपुरवठ्याचा त्रासजि.प.सदस्य, सरपंच व ग्रामस्थ आक्रमक