जळगाव : वाळू वाहतुक करणाºया डंपरवर कारवाईला विरोध म्हणून आकाशवाणी चौकात रस्त्यावर झोपून आत्महत्या करण्याची धमकी देत महामार्ग रोखणाºया १५ वाळूमाफियांविरुध्द रविवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही डंपर मालक तर काही चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्यांपैकी १२ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यात कैलास मंत्री (सोनवणे), सुनील नन्नवरे, बुधा नन्नवरे, रवी सपकाळे, बांभोरी, ता.धरणगाव, विठ्ठल पाटील (जळगाव), सुभाष पाटील (वैजनाथ) हाजी फिरोज सैय्यद (पाळधी), प्रवीण पाटील (रामेश्वर कॉलनी), मयुर ठाकरे (जळगाव), किरण चौधरी (भूषण कॉलनी), नाना बाविस्कर (निमखेडी) व बबलु कोळी (जैनाबाद) यांचा समावेश आहे.पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने हलली सूत्रमहामार्गावरुन बिनधास्तपणे अवैध वाळू वाहतूक होते व हेच वाळूमाफिया पोलिसांना वेठीस धरुन महामार्ग रोखण्यासारखे प्रकार करीत असल्याचा प्रकार पाहून पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर यांना फैलावर घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून रास्ता रोको करणाºया १५ जणांविरुध्द तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्राथमिक तपासी अमलदार संभाजी पाटील यांनी सायंकाळपर्यंत १२ नावे निष्पन्न केली. आणखी ३ जणांची नावे निष्पन्न केली जात असून या सर्व संशयितांच्या शोधार्थ पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे तपासी अमलदार संभाजी पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.आमचीच डंपर पकडतात का?शनिवारी आंदोलन करताना मंत्री याने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्याशी हुज्जत घालून आमचीच डंपर पकडतात, इतरांची तुम्हाला दिसत नाही का? असे म्हणत महामार्गावर झोपून आत्महत्या करतो अशी धमकी दिली होती. तर काही जणांनी कुनगर यांना नियंत्रण कक्षातच जमा करण्याची धमकी दिली होती. हा प्रकार समजल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी ‘हप्तखोरी’च्या संशयावरुन पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यानंतर रविवारी हा गुन्हा दाखल झाला.
रास्ता रोको करणाऱ्या १५ वाळूमाफियांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 11:09 PM