रावेर : ट्रकला दोन मजल्यात विभागून अपूर्ण जागेत ४८ गोºहे निर्यदतेने कोंबून व आगळीक करीत त्यांचा अमानुष छळ करून कत्तलीसाठी अवैधपणे वाहतूक करणाºया उज्जैन येथील ट्रकमालकासह त्या ट्रकवरील अज्ञात चालक व त्यांच्या साथीदारांविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक, जीवंत ४६ गोºहे व मयत दोन गोºह्यांसह १९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, संतप्त जमावाने ट्रक पेटवल्याप्रकरणी संशयीत सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असता रावेर न्यायालयाचे दिवाणी न्या.खानोलकर यांनी आरोपींना जामीन मंजूर करून सुटका केली आहे. मध्यप्रदेशातील लोणी आर.टी.ओ तपासणी नाक्याचा टोल तोडून पसार झालेल्या ट्रक क्र.(एम.पी.०९/एच.एफ.६०९४) ला कत्तलीसाठी निर्दयतेने अवैध गुरांची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने चोरवड-म.प्र.सीमेजवळ १७ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अडवले होते़ तेव्हा उभय ट्रकचालक व त्यांचे साथीदार पसार झाल्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने ४८ गोºहे कोंबून त्यांची निर्दयतेने छळ करून कत्तलीसाठी अवैध वाहतूक केल्याच्या तथा दोन गोºह्यांच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी रावेर पोलिसात पो.काँ.नीलेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ट्रकवरील चालक व त्याच्या साथीदारांसह मालक साबीर शाह अझिजशाह (रा.केशरपुरा मेहरपूर,जि.उज्जैन) यांच्याविरुद्ध भादंवि ४२९, प्राणी संरक्षण कायदा १९७६ चे कलम ५ (ब) व ९, प्राण्यांचा छळ अधिनियम १९६९ चे कलम ३,११ (अ) (५) व मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार ज्ञानेश फडतरे तपास करीत आहेत. दरम्यान, संतप्त जमावाने गुरे उतरल्यानंतर पोलिसांची नजरचुकवून ट्रकवरील बाटलीतील रॉकेल कॅबिनमध्ये टाकून पेटवून दिल्याप्रकरणी चार संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली होती. दरम्यान, रावेरचे दिवाणी न्या.खानोळकर यांनी आरोपींची जामीनावर सुटका करण्यात आली. (वार्ताहर)
गुरांची अवैध वाहतूक करणाºयाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 12:19 AM