जळगाव : टॉवर चौक परिसरात विना परवानगी राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे, पताका व पक्ष चिन्ह व इतर प्रचारसाहित्याचे दुकान मांडल्याप्रकरणी विनय गुलाबचंद गुप्ता (रा.जबलपूर, ह.मु.जळगाव) व जितेंद्र मधुकर शेटे (रा.अडावद, ता.चोपडा) यांच्याविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रचार साहित्य जप्त केले आहे.मुख्य निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक शरद कानडे यांचे पथक शुक्रवारी रात्री गस्तीवर असताना टॉवर चौक परिसरात त्यांना प्रचार साहित्याचे दुकान आढळून आले. त्यांच्याकडे मनपाचा परवाना मागितला असता तो आढळून आला नाही. त्यामुळे कानडे यांनी हे प्रचारसाहित्य जप्त करुन शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.
विना परवानगी प्रचाराचे साहित्य विक्रीप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:49 PM