विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १६ - अमेरिकन डॉलरच्या वाढत्या दराचा इंधन, सोन्यासह खाद्य तेलावरही परिणाम होऊ लागला असून आयात होणाऱ्या पाम तेलाचे भाव पुन्हा वाढले आहेत. या मुळे सोयाबीन व शेंगदाणा तेलाचे भाव वाढून तेलाला महागाईची फोडणी बसत आहे. सोयाबीन तेल ८५ ते ९० तर शेंगदाणा तेल ११४ ते १२० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.दररोज प्रत्येक घर तसेच खाद्य पदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम स्वयंपाक घराच्या ‘बजेट’वर होत असतो. मार्च महिन्यात आयात शुल्क वाढल्याने पाम तेल व सोयाबीन तेलाचे भाव वाढले होते. त्यानंतर आता पुन्हा भाववाढीत भर पडली आहे.अमेरिकन डॉलरचा भारतीय बाजारपेठेवर परिणामअमेरिकन डॉलरचे दर सातत्याने वाढत आहे. त्याचा परिणाम इंधन व सोने या भारतीय बाजारपेठेतील या दोन महत्त्वाच्या घटकांसह आता खाद्य तेलावरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात ६५ ते ६६ रुपयेअसलेले डॉलरचे दर मे महिन्यात ६७ रुपयांच्या पुढे गेले आहेत. १५ मे रोजी तर ते ६७.९८ रुपयांवर पोहचले आहेत. डॉलरच्या या वाढत्या दरामुळे मलेशिलायमधून आयात होणाºया पामतेलाचे भाव ८१ रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहे.दोन महिन्यात १३ रुपये प्रति किलो वाढएरव्ही पाम तेलाचे भाव इतर तेलाच्या तुलनेत कमीच असतात. या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते, त्यात थेट दुप्पट वाढ होऊन ते ३० टक्के झाले. त्यामुळे मार्च महिन्यातही पाम तेलाचे भाव वधारले होते. त्यानंतर त्यात पुन्हा वाढ होऊन दोन महिन्यांपूर्वी ६८ प्रति किलो असलेल्या पाम तेलाचे भाव सध्या ८१ रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.पामतेलाचे भाव सोयाबीन तेलापेक्षा वाढल्याने सर्वाधिक वापर असलेल्या सोयाबीन तेलाच्याही भाववाढीस मदत मिळत आहे. ७८ ते ८० रुपये असलेल्या सोयाबीन तेलाचे भाव आता ८५ ते ९० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.शेंगदाणा तेलातही वाढमार्च महिन्यात आयात शुल्कात वाढ झाली तरी शेंगदाणा तेलाचे भाव स्थिर होते. मात्र आता पाम तेल कधी नव्हे ते ८१ रुपयांवर व सोयाबीन ८५ ते ९० रुपयांवर पोहचल्याने शेंगदाणा तेलाचेही भाव ११४ ते १२० रुपयांवर पोहचले आहेत.सामान्यांसह व्यापाºयांचेही गणित बिघडलेचार ते पाच रुपये प्रति किलोने तेलाच्या दरात वाढ होत असली तरी याचा मोठा परिणाम सामान्यांसह व्यापाºयांच्याही गणितावर होत आहे. दररोज टनाने तेलाची खरेदी होत असलेल्या व्यापाºयांसाठी प्रति किलो चार रुपये वाढही गणित बिघडविणारे आहे.आयात शुल्कात वाढ झाल्याने दोन महिन्यांपूर्वी तेलाच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा डॉलरचे दर वाढत असल्याने पाम तेलाचे भाव वाढले आहे. त्यामुळे सोयाबीन व शेंगदाणा तेलाचेही भाव वाढत आहेत.- मनीष देवपुरा, तेल व्यापारी, जळगाव.वेगवेगळ््या कारणांनी खाद्य तेलाचे भाव वाढत आहे. सोयाबीन तेलाचे भाव कधी नव्हे एवढे वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांसह व्यापा-यांच्याही गणितावर परिणाम होतो.- सचिन छाजेड, किराणा व्यावसायिक.
तेलाला महागाईची फोडणी, डॉलरच्या वाढत्या दराचा खाद्य तेलावरही परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:01 PM
सोयाबीन तेल ५०० तर शेंगदाणा तेल ४०० रुपये प्रति क्विंटलने वधारले
ठळक मुद्देदोन महिन्यात १३ रुपये प्रति किलो वाढअमेरिकन डॉलरचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम