जळगाव : राज्य व केंद्र शासनाकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ हे अभियान राबविण्यात आले असून, याबाबत जळगाव महापालिकडून देखील शहराचे मानांकन वाढावे यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या अभियानंर्तगत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील भिंतीवर स्वच्छतेचा संदेश देत भिंती रंगविल्या जात असून, ओजस्विनी कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच दिवसात शहरातील ५०० हून अधिक भिंती रंगविल्या आहेत.९ जानेवारपासून ही मोहीम हाती घेण्यात आली. रविवारी या मोहीमेचा शेवटचा दिवस होता. रविवारपर्यंत जी.एस.ग्राउंण्ड, मनपा परिसर, टॉवर चौक, शिवाजी नगर उड्डाणपूल काव्यरत्नावली चौक, मू.जे.महाविद्यालय परिसर, खोटेनगर, दादावाडी, गणेश कॉलनी, शिवाजी नगर, आकाशवाणी चौक, महाबळ परिसरासह शहरातील विविध भागातील ५०० हून अधिक भिंतीवर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे स्लोगनचे आकर्षक चित्र रेखाटण्यात आले आहे.रंगविण्यात आलेल्या भिंतीकडे शहरातील प्रत्येक नागरिक आकर्षित होत असून, या भिंतीवर स्वच्छतेचे संदेश महात्मा गांधी यांच्यासह आई-मुले व काही जनजागृतीवरील संदेशाच्या माध्यमातून देण्यात येत असल्याने रंगविण्यात आलेल्या भिंती नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत.मनपाकडून देण्यात येईल विशेष प्रमाणपत्रविद्यार्थ्यांनी केलेल्या कामाबाबत मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी देखील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी स्वत: विद्यार्थ्यांची भेट घेत. चित्रांची माहिती घेतली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मनपाकडून विशेष प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मनपाने घेतला.‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ हे अभियान राबविण्याची जबाबदारी केवळ मनपाची नसून ती प्रत्येक जळगावकरांची आहे. त्यामुळे कोणतेही शुल्क न घेता आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला साथ देवून या मोहीमेत सहभाग घेतला असल्याचे मत ओजस्विनी विभागाचे प्राचार्य अविनाश काटे यांनी व्यक्त केले. तसेच या मोहीमेत ओजस्विनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाच्या कला विभागाच्या विद्यार्थिनींनी देखील आपला सहभाग घेतला.सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत केले कामबुधवारपासून घेण्यात आलेल्या या मोहिमेत ओजस्विनीच्या ७० विद्यार्थ्यांनी सलग पाच दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भिंती रंगविण्यातच व्यस्त राहिलेले पहायला मिळाले. मनपाकडून या विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली तर रंग मनपाकडूनच पुरविण्यात आला.
‘ओजस्विनी’च्या विद्यार्थ्यांनी विनामोबदला पाच दिवसात रंगविल्या ५०० भिंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:29 AM
स्वच्छतेचा दिला संदेश
ठळक मुद्दे मनपाकडून घेतले नाही कुठलेही शुल्क