ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.7 - केंद्र शासनाने जिल्हा बँकांकडील शिल्लक जुन्या नोटा स्वीकारण्यास मंजुरी दिल्याने जिल्हा बँकेची सुमारे 210 कोटींच्या जुन्या नोटा जमा करण्याची लगबग सुरू झाली आहे. या नोटा जमा करण्यासाठी देखील रिझव्र्ह बँकेने नियमावली पाठविली असून त्या पद्धतीने पॅकींग करून 19 जुलैर्पयत रिझव्र्ह बँकेच्या नागपूर शाखेत या नोटा जमा कराव्या लागणार आहे.
निम्मे काम पूर्ण
जिल्हा बँकेत रिझव्र्ह बँकेने दिलेल्या सूचनांनुसार नोटांची मोजणी व पॅकींग करण्याचे काम सध्या सुरू आहे. 210 कोटींपैकी निम्या नोटांचे पॅकिंग जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही एक-दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.