दवाखान्यातून उपचार घेऊन आल्यानंतर सदर वृद्धेने मारवड पोलिसात २१ रोजी तक्रार दिली आहे.
भरवस येथील महिला विमलबाई हनुमंत पाटील (६५) ही १७ जून रोजी आपल्या शेतात काम करीत असताना शेजारील शेतातील अशोक शांताराम पाटील, प्रकाश शांताराम पाटील व योगिता पाटील यांनी सामायिक बांध खोदला असता विमलबाई त्यांना सामायिक बांध खोदू नको, असे सांगितले. त्या वेळी तिघांनी तिच्या शेतात प्रवेश करून तिला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतर लोकांनी वाद मिटविल्यानंतर सदर महिलेने पोलिसात तक्रार करीन, असे म्हटल्यावर अशोक याने मागून महिलेच्या पाठीत दगड मारल्याने ती जखमी झाली. तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या वेळी तिघांनी तिचा मुलगा भय्यासाहेब यालादेखील दम दिला. उपचारानंतर तिघांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहेत.