शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

पुन्हा एकदा ‘भाऊ विरुध्द भाऊ’ सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:48 PM

सेनेच्या गुलाबरावांनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांना दिले आव्हान, महाजनांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्यावर जाहीरपणे सवाल उपस्थित, महाविकास आघाडीचे एकमेव लक्ष्य ठरत आहे गिरीश महाजन

मिलिंद कुलकर्णीभाजप - शिवसेना युतीच्या सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या गिरीश महाजन व गुलाबराव पाटील या दोन नेत्यांमध्ये संघर्षाचा अध्याय लिहिला जाईल, असे चित्र राजकीय पटलावर निर्माण झाले आहे. त्याला अनेक कारणेदेखील आहेत. गुलाबराव पाटील हे लढवय्या शिवसैनिक आहे. मुरब्बी राजकारण्यांसारखे खोटे बोलणे, वेळ मारुन नेणे, निर्णय न घेणे असे काही त्यांना जमत नाही. परिणामांची चिंता न करता ते मुलुख मैदान तोफेतून गोळे डागत असतात. कधी ते कामचुकार प्रशासनावर असतात तर कधी प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांवर असतात. गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांना उशिरा, तेही राज्यमंत्रीपद मिळाले होते. त्यावर ते फारसे समाधानी नव्हते. ‘चिडी मारण्याची बंदूक’ देऊन प्रभावी कामगिरीची अपेक्षा कशी करता ही त्यांची व्यथा असायची. याउलट युतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपने गिरीश महाजन यांना जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण अशी प्रभावशाली, वजनदार कॅबिनेट खाती दिली होती. पालकमंत्रीपद खडसे, फुंडकर यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे दीर्घकाळ राहिले. शेवटच्या टप्प्यात महाजनांना ते मिळाले. त्यामुळे गुलाबराव यांना जिल्ह्यात दुय्यम भूमिका मिळाली. हा सल त्यांच्या मनात राहिला.गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्यात साम्यस्थळेदेखील बरेच आहेत. दोघांची पार्श्वभूमी ग्रामीण आहे. तरुण वयात दोघेही राजकीय क्षेत्रात आले. कमालीचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वच पक्षात मित्र असले तरी पक्षावर देवासारखी श्रध्दा असा त्यांचा लौकिक आहे. शून्यातून पुढे आल्याने दीनदुबळे, सामान्य माणसांची जाणीव आहे. लोकांमध्ये मिसळणे, कामे करणे यात हातोटी असल्याने जनतेची गर्दी त्यांच्याभोवती कायम आहे. गुलाबरावांची स्वत:ची टपरी होती, तर महाजन हे टपरीवर उभे राहून जनसंपर्क साधत. दोघांमध्ये सख्य चांगले आहे. अधूनमधून होणारे वाद हे ‘नुरा कुस्ती’सारखे असतात असे सांगणारी मंडळीदेखील आहे. त्याला कारण असे की, त्यांचे जिवलग मित्र, सल्लागार हे काही प्रमाणात सारखे आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोघांमधील संबंध ताणले गेले, त्याला कारण दोघांची पक्षीय भूमिका असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते.महाराष्टÑात भाजपने शिवसेनेच्या मदतीने पक्षविस्तार केला असला तरी जळगाव जिल्ह्यात तसे झालेले नाही. जळगावात ३० वर्षांपासून भाजपच क्रमांक एकचा पक्ष राहिलेला आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बँकेत भाजपने सेनेला, किंवा त्यांच्या काही नेत्यांना सोबत घेतले नाही, हा अलिकडचा इतिहास आहे. विधानसभा निवडणुकीत सगळ्या ११ जागा जिंकण्याचे भाजपचे मनसुबे लपून राहिलेले नाही. अमोल शिंदे (पाचोरा), प्रभाकर सोनवणे (चोपडा), चंद्रशेखर अत्तरदे (जळगाव ग्रामीण), गोविंद शिरोळे (एरंडोल) हे भाजपचे बंडखोर सेनेच्या उमेदवारांविरुध्द उभे राहिले. त्यांना महाजन यांच्याकडून बळ दिले जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील सभेत गुलाबरावांनी उघडपणे संताप व्यक्त केला होता. महाजनांची ही कृती सेनेच्या पक्षश्रेष्ठी, संपर्कप्रमुख यांनाही खटकल्याने सेनेच्यादृष्टीने महाजन हे क्रमांक एकचे शत्रू झाले आहेत. युती तोडल्याची घोषणा करणारे खडसे यांच्याऐवजी महाजन हे सेनेच्या निशाण्यावर आले आहेत. स्वाभाविकपणे गुलाबरावांची भूमिका पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत अशीच राहणार आहे. त्यांना स्वत:ला विधानसभा निवडणुकीत त्रास झाला, पालकमंत्रिपदाच्या सहा महिन्यांच्या काळात महाजन त्यांच्यावर कुरघोडी करीत असल्याचे चित्र निर्माण झाले. कोरोना काळात अमळनेर, पाचोरा याठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, जळगावात कोरोना रुग्णालयाची पाहणी करणे अशा गोष्टींमधून महाजन समांतर व्यवस्था तयार करीत असल्याचे आणि प्रशासन त्यांच्या सूचनांवर अंमल करीत असल्याची टीका होऊ लागली. एनएसयुआयने तर जाहीरपणे ही टीका केली. अखेर गुलाबरावांनीही महाजन यांची महा आरोग्य शिबिरे, आरोग्यदूत यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत आरोग्य क्षेत्रातील कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिकडे जामनेरातून महाजनांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी संजय गरुड यांनीही जी.एम. रुग्णालय अधिग्रहणाची मागणी करून महाजनांना पेचात पकडले आहे. रिलायन्सच्या मदतीने उभारलेले दोन कोटींचे जामनेरातील रुग्णालय, जळगावातील नानीबाई मनपा रुग्णालयातील प्रयोगशाळा याविषयी महाजन घोषणा करीत असले तरी कोरोना काळात ते सुरू झालेले नाही. त्यामुळे टीकेची धार टोकदार होत असताना महाजन काय भूमिका घेतात, यावर पुढील द्वंद्व कसे असेल याची दिशा निश्चित होईल.नाथाभाऊ विरुध्द गुलाबभाऊ असा सामना यापूर्वी झाला आहे. जाहीर टीकेपाठोपाठ न्यायालयीन लढाईदेखील झाली. आता गिरीशभाऊ विरुध्द गुलाबभाऊ असा सामना सुरू झाला आहे. ही नुरा कुस्ती तर नाही, हा प्रश्नही आहेच.जिल्हा प्रशासनावर प्रभाव कुणाचायासंबंधी देखील चर्चा सुरू असते. मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यापैकी कुणाच्या सूचनेवर प्रशासन निर्णय घेत आहे, याविषयी मतमतांतरे आहेत. एनएसयुआय या काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीने महाजनांच्या सूचनांना महत्त्व देऊ नये, असे जाहीर आवाहन केले. तर गुलाबरावांनी महाजनांच्या आरोग्यक्षेत्रातील कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले .

टॅग्स :Jalgaonजळगाव