जळगाव : कारागृहात असलेल्या मित्राला भेटण्यासाठी आलेला सनी जाधव व त्याचा मित्र रणजित इंगळे यांच्यावर कारमधून आलेल्या दोघांनी तीक्ष्ण पट्टीने हल्ला करून गंभीर जखमी केले होते़ या प्रकरणाचा जिल्हापेठ पोलिसांनी उलगडा केला असून हल्ला करणाºया एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे़ गणेश लक्ष्मीनारायण तलारे (२७, रा़ अशोकनगर वार्ड, भुसावळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे़रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी सनी बालकिसन जाधव हा मित्र रणजित इंगळे यांच्यासह ११ मे रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा कारागृहात असलेला मित्र खुशाल मराठे याला भेटण्यासाठी आला होता़ कारागृहाच्या गेटजवळ उभे असताना कारमधून (एमएच़०२़सीडी़०७३७) हे दोन तरूण आले व त्यातील एकाने सनी याला सांगितले की, गांजा आणि चिवड्याचे पाकिट द्यायचे आहे़ त्यावर सनी याने असे काही मध्ये देता येत नाही, असे सांगितले़ याचा राग येवून कारमधून आलेल्या त्या दोघांनी सनी व त्याच्या मित्रास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली़ दोघांच्या पाठीवर, चेहºयावर व हातावर तीक्ष्ण पट्टीने वार करून गंभीर जखमी केले़ नंतर ते दोघे कारमधून पसार झाले़ याबाबत सनी याच्या जबाबावरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़तीन पथक होते हल्लेखोरांच्या शोधार्थजिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला होता़ नंतर त्यातील एक हल्लेखोर हा भुसावळ येथील असल्याची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांच्या पथकानेही त्यांचा शोध सुरू केला़ त्यातच तो संशयित नाशिक येथे असल्याचे कळताच नाशिक पोलिसांचेही पथक त्याच्या मागावर होते़ अखेर जिल्हापेठ, नाशिक व भुसावळ पोलिसांच्या पथकाच्या मदतीने गणेश लक्ष्मीनाराण तलारे हा एक हल्लेखोराला नाशिक रोडवरील सिन्नर फाट्याजवळ त्यास पकडण्यात पोलिसांना यश आले़ दरम्यान, त्याचा दुसरा साथीदार हा अद्याप फरार असून पोलीस त्याच्या शोध घेत आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे़
कारागृह आवारात हल्ला करणाऱ्या एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 11:54 AM