जळगाव - पिंप्राळ्यातील २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ रोजी मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश नरेंद्र बाविस्कर (वय २१, रा. पिंप्राळा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
गणेश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. तसेच खासगी नोकरी देखील करीत होता. १८ रोजी मध्यरात्री त्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटूंबियांनी याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. गणेश याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत गणेश याच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. अनमोल पटेल तपास करीत आहेत.