जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जरी असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाण समाधानकारक आहे. शनिवारी एका दिवसात २१७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मात्र, दुसरीकडे एका दिवसात २३४ रूग्णांनी कोरोनावर मात करीत घरी परतले आहे़जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही ७ हजार ४९२ इतकी झाली आहे़ त्यातील ४ हजार ६५२ बाधित रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ तसेच ३८१ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शनिवारी जळगाव शहरात ९८, जळगाव ग्रामीय ३, भुसावळ १६, अमळनेर १०, चोपडा ११, पाचोरा ५, भडगाव २, धरणगाव २, यावल ५, एरंडोल २३, जामनेर १२, रावेर १६, पारोळा १, चाळीसगाव १०, मुक्ताईनगर १, बोदवड १, इतर जिल्ह्यातील १ असे एकूण २१७ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.
एका दिवसात... नवीन रूग्ण २१७ तर बरे झाले २३४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 8:10 PM