चाळीसगाव: वाघळी येथे शेतातील विहिरीत पाय घसरुन पडल्याने अशोक सांडू भोई (वय ५२) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मृत हा चंद्रकांत भोळे यांच्याकडे कामाला होता. त्यांच्याच वाघळी -भडगाव रस्त्यावरील शेतात असणाऱ्या विहिरीत ही घटना घडली. अशोक भोई यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे. ग्रामीण पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 2:47 PM