निंभोरा बुद्रूक, ता.रावेर, जि.जळगाव : येथील रहिवासी व शेतमजुरी करणारे मोतीलाल श्रीपत भंगाळे (५८) यांचा १८ मे रोजी दुपारी दीडला उष्माघाताने मृत्यू झाला.भंगाळे हे दुपारी एकच्या सुमारास शेतात खत भरण्याचे काम आटोपून घरी आले होते. घरी आल्यावर त्यांनी आंघोळ केली. कपडे घालतानाच ते खाली कोसळले व त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी गावातील स्थानिक डॉक्टरांना बोलावले असता त्यांनी भंगाळे यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. वाढत्या तापमानाने गरीब कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांची अंत्ययात्रा १९ रोजी निंभोरा येथील राहत्या घरून सकाळी ९ वाजेला निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिण, दोन मुले असा परिवार आहे. ते निंभोरा येथील मिलिंद व हेमंत भंगाळे यांचे वडील होत.मोतीलाल श्रीपत भंगाळे हे खाली कोसळल्याचा निरोप मिळताच त्यांना बघायला गेलो. तेव्हा ते पडताच क्षणी मरण पावलेले होते. त्यामुळे कोणतीच टिटमेंट करू शकलो नाही. ते दुपारी शेतातून आले होते. त्यांना काहीतरी उन्हाचाच फटका बसला म्हणून त्यांचा मृत्यू झाला असावा.-डॉ.एस.डी.झोपे, निंभोरा
रावेर तालुक्यातील निंभोरा येथे एकाचा उष्माघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 9:35 PM
निंभोरा बुद्रूक येथील रहिवासी मोतीलाल श्रीपत भंगाळे (५८) यांचा १८ मे रोजी दुपारी दीडला उष्माघाताने मृत्यू झाला.
ठळक मुद्देशेतातून काम आटोपून घरी परतलेदुपारी आंघोळ केलीअन् कपडे घालत जमिनीवर कोसळलेत्यातच त्यांचा मृत्यू झाला