आॅनलाईन लोकमतजळगाव, दि १८ : मुद्रा योजनेंतर्गत पाच लाखाचे कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली शेख तस्रीम इकबाल (वय ४० रा.उस्मानिया पार्क, शिवाजी नगर, जळगाव) या महिलेची एक लाख पाच हजार रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकर उघडकीस आला आहे. याप्रकरणी पूजा (पुर्ण नाव नाही), मनिष कुमार व अमितकुमार या तिघांविरुध्द रविवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, १९ डिसेंबर २०१७ रोजी वर्तमानपत्रात मुद्रा योजनेंतर्गत कर्ज प्रकरणाची जाहीरात प्रसिध्द झाली होती. शेख तस्नीम यांनी जाहीरातमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता पूजा नामक महिलेने प्रासेसिंग शुल्क म्हणून ३ हजार २५० रुपये स्टेट बॅँकेत भरायला सांगितले.त्यानुसार त्यांनी ही रक्कम भरली, त्यानंतर कर्ज मंजूर झाल्याचे सांगून १० हजार ४०० रुपये सिक्युरिटी डिपॉझिट, इनकम टॅक्सचे १५ हजार व कर्जाचे पहिले दोन हप्ते ११ हजार ३०४ अशी रक्कम बॅँकेत भरायला सांगितले. शेख यांनी ही रक्कम देखील भरली. त्यानंतर अमितकुमार यांचा फोन आला व डीडीचे २० हजार, कमिशनचे १० हजार व एजंट कोडचे १५ हजार रुपये अशी रक्कम बॅँकेत भरायला सांगितली. शेख यांनी सात वेळा वेळोवेळी ही रक्कम भरली. कर्ज केव्हा मिळेल या साठी विचारणा केली असता त्यांच्याकडून टाळाटाळ झाली नंतर मोबाईलच बंद येवू लागले. याबाबत ओळखीच्या व्यक्तीला विचारले असता अशी कोणतीच योजना नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेख तस्नीम यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
मुद्रा योजनेच्या नावाखाली जळगावातील महिलेची एक लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 4:53 PM
मुद्रा योजनेंतर्गत पाच लाखाचे कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली शेख तस्रीम इकबाल (वय ४० रा.उस्मानिया पार्क, शिवाजी नगर, जळगाव) या महिलेची एक लाख पाच हजार रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकर उघडकीस आला आहे. याप्रकरणी पूजा (पुर्ण नाव नाही), मनिष कुमार व अमितकुमार या तिघांविरुध्द रविवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे पाच लाखाचे कर्ज प्रकरण मंजूर करण्याचे दाखविले आमिषसात वेळा बॅँकेत भरले एक लाख ५ हजार रुपये व्हॉट्सअॅपवरच दिले कागदपत्र