कजगाव ता.भडगाव: भोरटेक येथील शेतकरी आनंदा कौतिक पाटील व दशरथ कौतिक पाटील यांच्या उमरखेड शिवारातील कजगाव -चाळीसगाव या मार्गालगत असलेल्या उसाच्या शेताला लागलेल्या आगीत दिड ते दोन एकर क्षेत्रातील ऊस जळुन खाक झाला ४ रोजी रात्री ही घटना घडली. यात अंदाजे दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे.अचानक आग लागली असता ही वार्ता लगेचच या शेतकऱ्याच्या कानावर पडली. यानंतर सर्व कटुंब तातडीने शेताकडे धावले. मात्र तो पर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते हाती तोंडी आलेला घास जळत असल्याचे पाहून शेतकऱ्याची पत्नी व मुलांनी हंबरडा फोडला. वळच असलेल्या हौदातुन पाणी घेत आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आले. मात्र सारे प्रयत्न व्यर्थ ठरले. दरम्यान आगीचे कारण मात्र समजले नाही.स्वप्नांची झाली राखस्वत:च्या शेतात ऊस लागवड करून तेथेच रसवंती थाटली. घरचा ऊस व घरची रसवंती यामुळे उत्पन्न चांगले मिळेल व आलेल्या उत्पन्नात घर बांधण्यासाठी घेतलेले कर्ज फेडले जाईल, हे स्वप्न पाहता सारे सुरळीत होते मात्र आगीने या स्वप्नंची राख रांगोळी केल्याने पाटील परिवार हताश झाला आहे.
आगीत दीड एकर ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 3:15 PM