कजगाव ता.भडगाव, जि.जळगाव : अर्धा पावसाळा संपला आहे. श्रावणाच्या सरी रीमझीम बरसत पिकांना केवळ आधार मिळत आहे. या परिसरातील तितूर नदी मात्र अद्यापही कोरडीच आहे. भर पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला पाहिजे तिथे मात्र हिरवे रान फुलले आहे. येथे चक्क गुरे चारली जात असल्याने तितूर नदी परिसरातील नागरिक दमदार पावसाची व तितूर नदी दुथडी भरून वाहण्याची वाट पहात आहेत.राज्यात अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. अनेक नद्यांना महापूर आले आहेत. काहींनी धोक्याच्या पातळ्या ओलांडल्या आहेत. मात्र चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तीन तालुक्यातून वाहणारी तसेच पाटणादेवी उगमस्थान असलेल्या या नदीस अर्धा पावसाळा संपल्यानंतरही एक थेंब पाणी नाही. चक्क पावसाळ्यात या नदीचे पात्र कोरडे पडले आहे. भर पावसाळ्यात या नदीची जागा पाण्याऐवजी चक्क हिरव्यागार गवताने घेतली आहे. नदी पात्र हिरव्यागार रानाने फुलले आहे. गुरे चराईसाठी याचा उपयोग होत आहे.तीन वर्षांपासून नदी कोरडीचगेल्या तीन वर्षांपासून या नदीस एकही पूर गेलेला नसल्याने बागाईत शेतीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. नदी काठावरील पाणीपुरवठा योजना निकामी होऊ पहात आहे. परिसरातील जल पातळ्या दरवर्षी खोल जात असल्याने गेल्या तीन वर्षांपासून तितूर नदी परिसरात चिंताग्रस्त वातावरण आहेतितूर नदीस अनेक अडथळेपाटणादेवी उगमस्थान असलेल्या या नदीच्या उगमस्थानी पडणाऱ्या जेमतेम पावसामुळे नदीसदेखील जेमतेम पाण्याची धार येते. ती धार चाळीसगाव तालुक्याच्या हद्दीपर्यंत पोहचते नी तितूरचीही धार आटते. कारण गेल्या दोन वर्षांपूर्वी या नदीवर चाळीसगाव तालुका हद्दीपर्यंत अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे (विना गेट) चे बनविण्यात आले आहेत. या बंधाºयात जेमतेम येणारे पाणी पूर्णपणे जिरते. यामुळे नदीचे पाणी पुढे सरकत नाही. परिणामी भडगाव व पाचोरा तालुक्यातील सात गाव तितूरच्या पाण्यापासून वंचित आहे. यात भडगाव तालुक्यातील उमरखेड, तांदूळवाडी, भोरटेक, कजगाव, पासर्डी तर पाचोरा तालुक्यातील पिंप्री, घुसर्डी या गावात गेल्या तीन वर्षात तितूर नदीला पाणीच आले नाही. यामुळे या सात गावातील पीक परस्थिती, पाणी प्रश्न भेडसावत आहे.विनागेटच्या बनविलेल्या सिमेंट बंधाºयास तत्काळ गेट बसवून यात अडकणारे पाणी पुढील गावासाठी मार्गस्थ करावे. जेणेकरून सात गाव तितूरच्या पाण्यापासून वंचित रहाणार नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहेभडगाव तालुक्यात सरासरी पाऊस ४४.४ दाखविण्यात आला आहे. ६३ गावांची पावसाची सरासरी केवळ चार गावातील पर्जन्यमापकाने करत तालुक्याची सरासरी काढली जाते. ती कितपत योग्य आहे कारण कजगाव परिसरात आतापर्यंत केवळ रिमझिम पाऊस झाला आहे. आजही नदी, नाले सारेच कोरडे आहेत. तरीदेखील तालुक्यात पाऊस ४४.४ टक्के कसा हिच चर्चा कजगाव परिसरात चर्चिली जात आह.े
एकीकडे नद्यांना पाणी, तर दुसरीकडे कजगावला तितूर नदीपात्रात हिरवे रान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 7:22 PM
अर्धा पावसाळा संपला आहे. श्रावणाच्या सरी रीमझीम बरसत पिकांना केवळ आधार मिळत आहे. या परिसरातील तितूर नदी मात्र अद्यापही कोरडीच आहे. भर पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला पाहिजे तिथे मात्र हिरवे रान फुलले आहे.
ठळक मुद्देतितूर नदीस अनेक अडथळेतीन वर्षांपासून नदी कोरडीच