आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. ३० - धावत्या प्रवासी रेल्वेत असाणा-या गस्ती पथकाने मुंबई - हावडा एक्सप्रेसमध्ये बेवारस स्थितीत असलेला एक लाख ३३ हजार ९८० रुपये किंमतीचा १३ किलो गांजा जप्त केला असून ही कारवाई मंगळवारी रात्री साडे दहा वाजता चाळीसगाव रेल्वेस्थानकावर आली असताना करण्यात आली.मुंबई - हावडा एक्सप्रेस मंगळवारी रात्री जळगाव स्थाकावरुन निघाली असताना भुसावळ ते इगतपुरी दरम्यान गस्त घालणा-या पोलीस नाईक प्रशांत थोटे आणि पोहेकाँ मनोज नन्नवरे यांना बोगी क्र. एस ४ मध्ये सीट क्र. ७१ जवळ काळ्या रंगाच्या बॅग मध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली. सदर बॅग रेल्वे स्थानकावर उतरुन बॅगची तपासणी केली असता त्यात हिरव्या रंगाचा काडीदार गांजा (वजन १३ किलो ३९८) आढळून आला. चाळीसगावचे तहसीलदार कैलास देवरे यांच्या उपस्थित रात्री दोन वाजता पंचनामा करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात धावत्या रेल्वेतून गांजा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तपास भुसावळ रेल्वे पोलीस करीत आहे.
मुंबई - हावडा एक्सप्रेसमध्ये बेवारस स्थितीत असलेला एक लाख ३३ हजाराचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:37 PM
गस्ती पथकाची कारवाई
ठळक मुद्देचाळीसगाव रेल्वे स्थानकावर पंचनामागुन्हा दाखल