जळगाव : चौघुले प्लॉट भागातील किशोर मोतीलाल चौधरी (३२) खून प्रकरणात न्यायालयाने सुरेश दत्तात्रय सोनवणे (४४) याला न्यायालयाने जन्मठेप तर उमेश धनराज कांडेलकर (३२), रत्नाबाई सुरेश सोनवणे (३९) व वैशाली उमेश कांडेलकर (२९) सर्व रा.प्रजापत नगर, जळगाव यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.दरम्यान, या प्रकरणातील अन्य दहा जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. कैलास सोनवणे यांचे दोषारोपपत्रात नाव आहे, मात्र आरोपी म्हणून नाव नाही, त्यात त्यांना पोलिसांनीच फरार दाखविले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी शनिवारी हा निकाल दिला.काय होती घटनागणेश विश्वास सपकाळे याच्याविरुध्द दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात सागर चौधरी फिर्यादी आहे. या गुन्ह्यात त्याने गणेश सपकाळे याला मदत करावी, कोर्टात विरोधात साक्ष दिली आहे असे म्हणत सुरेश दत्तात्रय सोनवणे, उमेश धनराज कांडेलकर या दोघांनी बर्फ फोडण्याच्या टोच्याने व इतरांनी किशोर चौधरी याच्यावर हल्ला केला होता तर भांडण सोडविण्यासाठी आलेले मोतीलाल भावलाल चौधरी, योगीता किशोर चौधरी, जयश्री सागर चौधरी, सुभद्राबाई मोतीलाल चौधरी व नीलेश पंडीत चौधरी यांना इतर १० ते १५ जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद मोतीलाल चौधरी यांनी दिली होती. दरम्यान, उपचार सुरु असताना किशोर चौधरी याचा मृत्यू झाला होता. तपासाधिकारी तत्कालिन पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.पोलिसांवर ओढले ताशेरेन्यायालयाने निकाल देताना पोलिसांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.सीसीटीव्ही फुटेज ठरले आधारया खटल्यात न्यायालयाने सीसीटीव्हीचा बारकाईने अभ्यास केला. त्यात प्रत्यक्ष घटनास्थळी चार जण दिसून येत आहेत. मुख्य आरोपी सुरेश सोनवणे याच्याजवळ बर्फ फोडण्याचा टोचा दिसत नसला तरी तो कमरेत किंवा खिशात ठेवला असू शकतो, असे मत नोंदविले. त्याशिवाय न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेने (सी.ए.) दिलेल्या अहवालात जप्त केलेल्या टोचाला मानवी रक्त लागलेले असल्याचे म्हटले आहे. या खटल्यात सरकारपक्षातर्फे १४ तर बचावासाठी ४ असे १८ साक्षीदार तपासण्यात आले आहेत...तर कैलास सोनवणेंविरुध्द खटला चालू शकतोविद्यमान नगरसेवक कैलास नारायण सोनवणे यांचे दोषारोपपत्रात नाव आहे, मात्र त्यात त्यांच्यावर कोणताही आरोप ठेवलेला नाही, परंतु फरार दाखविण्यात आले आहे. या मुद्यावर जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सोनवणे यांच्याविरुध्द कायदेशीररित्या खटला चालू शकतो असे मत व्यक्त केले. दरम्यान, या निकालाच्याविरुध्द अपील करु असेही अॅड.ढाके यांनी पत्रकारांना सांगितले.शिक्षा २४ महिन्याची; प्रत्यक्षात कारागृहात भोगले ४४ महिनेयाप्रकरणात उमेश धनराज कांडेलकर, रत्नाबाई सुरेश सोनवणे व वैशाली उमेश कांडेलकर यांना न्यायालयाने कलम ३२४ अन्वये दोन वर्ष म्हणजे २४ महिने कारावाची शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात हे तीनही जण ४४ महिने कारागृहात होते. म्हणजे शिक्षेपेक्षा २० महिने ते जास्त कारागृहात होते.
खून प्रकरणी एकाला जन्मठेप तर तिघांना दोन वर्ष कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:40 AM