चाळीसगाव, जि.जळगाव : रोटरी मिलेनियम आणि गायत्री नेत्रालय यांच्यातर्फे तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले असून, गुरुपौर्णिमा ते पुढील महिनाभर शिबिर असेल.शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशांत बच्छाव यांना माजी प्रांतपाल डॉ.सुनील राजपूत यांच्या हस्ते रोटरी सदस्यत्वाची पीन प्रदान करण्यात आली. या वेळी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.कल्पेश सोनवणे, रोटरी मिलेनियमचे अध्यक्ष डॉ.प्रमोद सोनवणे, डॉ.शैलेंद्र पवार, पालिकेचे शिक्षण सभापती सूर्यकांत ठाकूर, पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेश चव्हाण, राजेश पवार, अरुण जगताप, राजेश चव्हाण आदी शिक्षकांची नेत्र तपासणी करण्यात आली.या वेळी रोटरी मिलेनियमचे संस्थापक अध्यक्ष प्रीतेश कटारिया, सचिव केतन बुंदेलखंडी, ज्ञानेश्वर माखिजानी, नीलेश निकम, प्रा.अनिल बागड, मधुकर कासार, नीलेश निकम, स्वप्नील कोतकर, चेतन पल्लण, मयूर शिंदे, प्रवीण अमृतकर, सोपान चौधरी, हर्शद जैन, राहुल चौधरी, टोनी पंजाबी, ब्रिजेश पाटील, नीलेश कोतकर, सुरेश मंधानी, भैयासाहेब महाजन आदी उपस्थित होते.
चाळीसगाव रोटरीतर्फे एक महिना नेत्रतपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 8:13 PM