ऑनलाईन लोकमत
ऐनपूर, ता़रावेर,दि.28- येथून जवळच असलेल्या निंबोल येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली़ शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली़ रवींद्र रमेश जावा (वय 30) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आह़े
मूळचे जळगाव जामोद येथील रहिवासी असलेले रवींद्र जावा यांचा गेल्या काही वर्षापासून निंबोल येथे सासरवाडीत रहिवास होता. शेतीत काम करून ते उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती मिळाली़ सासरे सुभाष हिरामणलाल हेमकर यांच्या घरात शनिवारी सकाळी मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली़
दरम्यान, पाच ते सहा दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आह़े मृतदेह कुजल्याने मोठय़ा प्रमाणावर दरुगधी निर्माण झाल्याने घटनास्थळीच डॉक्टरांना बोलावून शवविच्छेदन करण्यात आल़े निंभोरा पोलीस ठाण्याचे ज्ञानेश्वर पाकळे व सहका:यांनी पंचनामा केला़ नेमका मृत्यू गळफास घेतल्याने झाला की अन्य कारणाने याचा पोलीस शोध घेत आहेत़