जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात जळगाव जिल्ह्यात ८ लाख १२ हजार ४७७ कुटुंबांतील ३४ लाख ८१ हजार १६९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये १ लाख ९ हजार ५१९ जुन्या विकारांचे (कोमॉर्बिड) रुग्ण आढळून आले.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जळगाव महापालिका क्षेत्रात महानगरपालिकेचा आरोग्य विभाग तर जिल्ह्यातील १८ नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात स्थानिक आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे २ हजार ५३३ पथके, नगरपालिका क्षेत्रांमध्ये २८० तर महापालिका क्षेत्रात १३४ असे एकूण २९७४ पथकांनी तपासणी केली.जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांनी ६ लाख ५३ हजार ६७३ कुटुंबांना भेट दिली. या तपासणीत आरोग्य पथकांना ७८ हजार २१० जुन्या विकारांचे, सारीचे ५५५ तर सर्दी, खोकला, तापचे ६ हजार ३३२ रुग्ण आढळून आले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात येवून ९ हजार ३३९ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी ८८७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.जिल्ह्यातील अठरा नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील ६८ हजार ८८८ कुटूंबातील ४ लाख ६८ हजार ३६ नागरीकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २० हजार ५२९ जुन्या आजारांचे रुग्ण आढळून आले. तर १ हजार ६८३ संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. यापैकी ३३९ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.त्याचप्रमाणे जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात ८९ हजार ९१६ कुटूंबातील ३ लाख ५ हजार ८२२ नागरीकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १० हजार ७८० जुन्या आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. तर सारीचे १८, सर्दी, खोकला, तापाचे १७९ रुग्ण आढळून आले. यापैकी १६६ व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते तर ८६ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले.
एक हजार २२६ कोरोना बाधित आले समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 9:31 PM