जळगाव- सोयगाव चाळीसगाव रस्त्यावरील निंबायती फाट्याजवळ सुकी नदी पुलावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाला झालेल्या अपघातात कवली ता. सोयगाव येथील अरुण माणिक केंडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपळगाव हरेश्वर ( ता.पाचोरा ) येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अरुण हा सेलवास येथे मँकेनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत होता ,तो सोयगावकडे जात असताना हा अपघात झाला. ऐन दिवाळीचे दिवशी कवली गावाचा तरुण गेल्याने गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अरुणची आईसुद्धा काही वर्षांपूर्वी अपघातात मरण पावली होती. त्यावेळी अरुण अपघातातून थोडक्यात बचावला होता.
चाळीसगावनजीक अपघातात सोयगावच्या तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 12:46 AM