अमळनेर/ चोपडा : कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकयांना न्याय द्या अशी मागणी अमळनेर तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच चोपडा येथे किसान मोर्चातर्फे निवेदन देऊन केली आहे.अमळनेरयेथे तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, जगभरात लॉकडाऊन असतांना मोठ्या कष्टाने शेतकºयाने कांदयाचे उत्पादन घेतले. कांद्याला आता कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हाता पडतील अशी शेतकºयाला आशा होती. पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. तीन महिन्यापूर्वी म्हणजेच ४ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनाश्यक वस्तूंच्या यादीतुन वगळले असल्याची घोषणा करुन स्वत:ची पाठ थोपटवून घेतली होती आणि त्यांनीही तीन महिन्यात घुमजाव करुन निर्णय बदलुन शेतकºयांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे कांदयाचे भाव कोसळून शेतकºयाचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. तरी कांदा उत्पादक शेतकºयांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवुन शेतकºयांना न्याय दयावा अशी मागणी केली आहे.यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ बोरसे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील, रेशनिंग समिती अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, सुनील पाटील,अनंत निकम आदी उपस्थित होते.चोपडाकांदा निर्यातबंदी बाबत किसान सभा किसान मोर्चा व इतर संबंधित शेतकरी संघटना या प्रश्नावर पुढील आठवड्यात आंदोलन करणार आहे असा इशारा भाकप नेते अमृत महाजन, सूकाणु समीतीने सदस्य एस. बी. पाटील, किसान मोर्चाचे कृष्णा बाविस्कर, संभाजी बाविस्कर, अशोक भाईदास बाविस्कर, नवल बाविस्कर, छोटू पाटील, कैलास महाजन, वासुदेव कोळी, रवी महाजन, गोरख वानखेडे, देवानंद बाविस्कर, गोवर्धन सोनवणे, गंगाराम प्रल्हाद महाजन, मूकेश महाजन, राकेश महाजन, रमेश महाजन, शिवाजी पाटील, मनोहर चौधरी, अडावद, लासुर, धानोरा परीसरातील शेतकरी आदींनी दिला आहे.
कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 5:18 PM