चाळीसगाव, जि.जळगाव : शेतमालाचे भाव पडले असताना महागाईचा आगडोंबही उसळला आहे. याचा सुवर्णमध्य काढत डॉ.देवरे फाऊंडेशन संचलित सिद्धी महिला मंडळाने हळदी-कुंकू समारंभात संक्रांतीचे वाण म्हणून सुवासिनींना ‘कांद्या’चे वाण लावून नवा आदर्श अधोरेखित केला. यासाठी डॉ.उज्ज्वला जयवंत देवरे यांनी थेट शेतकºयांकडून कांदा खरेदी करून त्यांना मदतीचा हात दिला.रविवारी दुपारी लक्ष्मी नगरात हळदी-कुंकू समारंभ व आनंद मेळावाही पार पडला. उद्घाटन पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी चाळीसगाव न्यायालयाच्या न्यायाधिश अनिता गिडकर, युगंधरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता प्रशांत बच्छाव, डॉ.जयवंत देवरे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दोनशेहून अधिक सुवासिनींना संक्रांतीचे वाण म्हणून यावेळी कांद्याचे वाटप करण्यात आले.प्रास्ताविकात सिद्धी महिला मंडळाच्या प्रमुख व देवरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.उज्ज्वला देवरे यांनी उपक्रमाची भूमिका विशद करताना संवेदना, समर्पण आणि आनंद ही त्रिसूत्री घेऊन महिलांना कांद्याचे वाण देण्याची संकल्पना फलद्रूप झाली. यातून बळीराजाला मदत करण्याचा हेतूही साध्य झाल्याचे सांगितले.आनंद मेळाव्यात महिलांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावून मौजही केली. यावेळी उत्कृष्ट खाद्यपदार्थ, उखाणे स्पर्धा झाल्या. वेगवेगळ्या क्षेत्रात संकटांना सामोरे जात प्रेरणादायी ठरलेल्या महिलांचा सत्कारदेखील करण्यात आला. स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या महिलांना देखील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
चाळीसगाव येथे महिलांना लावले ‘कांद्याचे’ वाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 7:34 PM
शेतमालाचे भाव पडले असताना महागाईचा आगडोंबही उसळला आहे. याचा सुवर्णमध्य काढत डॉ.देवरे फाऊंडेशन संचलित सिद्धी महिला मंडळाने हळदी-कुंकू समारंभात संक्रांतीचे वाण म्हणून सुवासिनींना ‘कांद्या’चे वाण लावून नवा आदर्श अधोरेखित केला.
ठळक मुद्देहळदी-कुंकू समारंभातून बळीराजाला मदतमहागाईचा आगडोंबही उसळला असताना शेतकऱ्यांना मदतीचा हातवेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत महिलांचाही केला सन्मान