चाळीसगाव : अपघाताबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शासनाने स्वीकारलेले वाहतूक नियम आणि जनतेने नियमांचे पालन करणे, तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ऑनलाइन शिबिर घेण्यात आले.
तालुका विधिसेवा समिती, बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेज, आयक्युअेसी विभाग, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने न्या.एन.के. वाळके आणि अध्यक्ष तालुका विधिसेवा समिती यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम पार पडला.
प्रमुख वक्ते ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे होते. त्यांनी वाहतूक नियमांवर मार्गदर्शन केले.
दिवाणी न्यायाधीश एन.के. वाळके यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व युवकांच्या समस्या व उपाय या विषयावर मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले.
प्रस्तावना डॉ.एम.व्ही. बिल्दीकर यांनी केली. सूत्रसंचालन व आभार डॉ.अजय काटे यांनी केले.
ऑनलाइन शिबिरात सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश जी.व्ही. गांधे, ए.एच. शेख दुसरे सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश ए.एच. शेख, तिसरे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एम.व्ही. भागवत, चाळीसगाव वकील संघटनेचे अध्यक्ष पी.एस. एरंडे, चाळीसगाव तालुका वकील संघ सचिव कविता जाधव आणि वकील संघातील इतर सदस्य व शालेय विद्यार्थी अशा १०३ मान्यवरांनी सहभाग नोंदविला. प्रा.पंकज वाघमारे आणि चाळीसगांव तालुका विधिसेवा समितीचे डी.के. पवार व वाय.जे. चौधरी, किशोर पाटील, शिपाई यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.