जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने १९ जानेवारी पासून सुरू होणार असून ऑनलाईन परीक्षेच्या सरावासाठी मॉकटेस्ट देणे बंधनकारक आहे.
बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीएस.डब्लयू. (प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाचे सत्र-१ बॅकलॉग व रिपीटर, सत्र -३ व ५ नियमित व रिपीटर) तसेच पदवी स्तरावरील व्यवस्थापनशास्त्र (बॅकलॉग व रिपीटर), फार्मसी, एम.एस.डब्लू. (सत्र प्रथम बॅकलॉग, रिपीटर, सत्र-२,३,४ नियमित व बॅकलॉग), विधी (एप्रिल-२०२०), विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन एमसीक्यु स्वरूपात घेतल्या जाणार आहेत. ऑनलाईन परीक्षेचा सराव व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट देणे बंधनकारक असणार आहे.
तांत्रिक अडचणी आल्यास समन्वयकांशी साधा संपर्क
विद्यार्थ्यांना https://nmu.unionline.in या संकेतस्थळावर ही मॉकटेस्ट देता येणार आहे. काही काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास सॉफ्टवेअरमध्ये नीड सपोर्ट या चाटबोटद्वारे निराकारण करावे. तसेच महाविद्यालयात नेमणूक करण्यात आलेल्या परीक्षा समन्वयकाशी संपर्क साधावा, या परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.