भडगाव, जि.जळगाव : यंदाच्या खरीप हंगामात मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकी संघ भडगाव शाखा आडत दुकान पाचोºयाच्या कार्यालयात शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. भडगाव, पाचोरा, चाळीसगाव व एरंंडोल तालुक्यातील शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करता येईल.सर्व नोंदणी ही आॅनलाईन पध्दतीने होईल. त्यात ज्या तालुक्यात जमीन आहे त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकºयांना नोंदणी करावयाची आहे. मात्र ज्या तालुक्यात खरेदी केंद्र नसेल त्या तालुक्यातील शेतकºयांनी नजीकच्या तालुक्यातील केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विक्रीची नोंदणी करावी लागेल. या नोंदणीचा प्रारंभिक कालावधी एक महिना असेल. त्यासाठी आधार कार्ड प्रत व मूग, उडीद व सोयाबीन या पिकाची नोंद असलेला चालू वर्षाचा सातबारा आधार कार्डशी संलग्न बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, कॅन्सल चेक, शेतकºयाचा कार्यरत असलेला मोबाईल नंबर ही माहिती द्यावी लागेल. आवश्यक कागदपत्रे देऊन नोंदणी केल्यावर शेतकºयांना टोकण देण्यात येईल. तसेच पोर्टलवर नोंदणी करताना दिलेले टोकन व प्रमाणित नोंदणी रजिस्टर यामधील क्रमवारीनुसार पोर्टलवर नोंदणी होईल. टोकनच्या क्रमवारीनुसार नोंदणी रजिस्टर व पोर्टलवर नोंदीची जबाबदारी संबंधीत संस्थेची असेल नोदणी झालेल्या शेतकºयांना क्रमवारीनुसार शेतमाल विक्रीसाठी आणण्याबाबत कळवण्यात येईल, अशी माहिती भडगाव शेतकरी संघाचे चेअरमन प्रताप पाटील यांनी दिली.
शेतकी संघामार्फत मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:01 PM
यंदाच्या खरीप हंगामात मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकी संघ भडगाव शाखा आडत दुकान पाचोºयाच्या कार्यालयात शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.
ठळक मुद्देभडगाव, पाचोरा, चाळीसगाव व एरंंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदणी करता येणारज्या तालुक्यात जमीन आहे त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना नोंदणी करावयाची आहेज्या तालुक्यात खरेदी केंद्र नसेल त्या तालुक्यातील शेतकºयांनी नजीकच्या तालुक्यातील केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विक्रीची नोंदणी करावीप्रारंभिक कालावधी एक महिना असेल