शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

दोन वर्षात ८५ जणांना आॅनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:00 PM

सुनील पाटील । जळगाव : तंत्रज्ञानात जशी दिवसागिणक भर पडत आहे, अगदी त्याच पध्दतीने याच तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आॅनलाईन ...

ठळक मुद्दे सायबर क्राईम ५ लाख ४० हजाराचा मुद्देमाल वसूल२९ गुन्ह्यांमध्ये आरोपी निष्पन्नपरप्रांतीय आरोपी सापडेना

सुनील पाटील ।जळगाव : तंत्रज्ञानात जशी दिवसागिणक भर पडत आहे, अगदी त्याच पध्दतीने याच तंत्रज्ञानाचा उपयोग करुन आॅनलाईन फसवणूक असो की गंडा घालणे याचे प्रकार अधिक वाढत चालले आहेत. २०१८ ते २०१९ या दोन वर्षात सायबर पोलिसांकडे आॅनलाईन फसवणुकीचे ८५ गुन्हे दाखल झाले असून त्यातील फक्त २९ गुन्हे उघडकीस आले आहेत. ५६ गुन्हे अद्यापही प्रलंबित आहेत. सर्वच गुन्ह्यांमधील आरोपी परप्रांतीय असल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत.जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती झाल्यापासून कागदोपत्री ८५ गुन्हे दाखल झाले आहेत. प्रत्यक्षात असे अनेक गुन्हे घडले आहेत, की त्याची नोंद झालेली नाही. मात्र काही प्रकरणात तक्रार अर्जावरच तक्रारदाराला रक्कम परत मिळाल्याने गुन्हे दाखल झालेले नाहीत.२१ सप्टेबर २०१८ ला पहिला गुन्हातत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात १५ आॅगस्ट २०१७ रोजी सायबर लॅबची निर्मिती झाली. तत्कालिन पालकमंत्री स्व.पांडूरंग फुंडकर यांच्याहस्ते या लॅबचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर या लॅबचे सायबर पोलीस ठाण्यात निर्मिती झाली. जळगावला पहिला गुन्ह २१ सप्टेबर २०१८ रोजी दाखल झाला.टॉप टेन गुन्हे उघडपोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सर्वात जास्त सायबर गुन्ह्यांवर फोकस केले. दाखल झालेले गुन्ह्यापासून बोध घेऊन भविष्यात तसे गुन्हे घडूच नये यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व जनजागृतीवर अधिक भर दिला. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अंगत नेमाणे यांच्या पथकाने सर्वात महत्वाचे दहा गुन्हे उघडकीस आणून परिक्षेत्रात एक स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे या पथकाने आॅनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात ४ लाख १५ हजार ८०३ रुपये रोख स्वरुपात वसूल करुन तक्रारदाराला ती रक्कम मिळवून दिली आहे. त्याशिवाय एका गुन्ह्यात १ लाख २४ हजार ९०० रुपये किमतीचा मोबाईलही परप्रांतातून ताब्यात घेतला आहे.आरोपी परप्रांतीय असल्याने अडचणीसायबरच्या गुन्ह्यात जवळपास सर्वच आरोपी हे उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, नोएडा व राजस्थान याच भागातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर परप्रांतात जायचे असेल तर वरिष्ठांची परवानगी व इतर गुन्ह्यांच्या तपासात समन्वय राखण्यात यंत्रणेला कमालीची कसरत करावी लागते, परिणामी त्याचा फायदा आरोपींना होतो, मात्र जळगाव सायबर पोलिसांनी त्यावर मात करुन अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले. बिहार राज्यातील मनिकांत पांडे, शैलेश पांडे (रा.चिकनीगाठी, मोतीहारी, चंपारण) यांच्याकडून ३६ हजार ९०३ रुपये हस्तगत करण्यात यश आले. भुसावळ येथील सदानंद पुंडलिक बºहाटे यांना एटीएम कार्डचा क्रमांक विचारुन ४६ हजार ९९७ रुपयात गंडा घालण्यात आला होता. त्याशिवाय सागर राजेश बत्रा यांना ३ लाख ३२ हजार रुपयात आॅनलाईन गंडा घालण्यात आला होता. पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणून सुमन कुमार, अजय कुमार व नितीश कुमार (रा.नालंदा, बिहार) यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली आहे.सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अलीकडे वाढायला लागले आहेत. असे गुन्हे करणारे आरोपी बहुतांश परप्रांतीय आहेत. त्यामुळे तपासाला जाताना अडचणी येतात व त्याचा फायदा आरोपींना होतो. या गुन्ह्यातील आरोपी ओळख लपवून वावरतात. तरीही महत्वाचे दहा गुन्हे उघडकीस आणण्यात आम्हाला यश आले आहे.-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव