शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

प्राध्यापकांच्या नियमित पगाराची फक्त १० महाविद्यालयांना काळजी!

By अमित महाबळ | Published: September 07, 2023 7:18 PM

जुलै व ऑगस्ट महिन्याचे शिक्षकांचे मानधन थकित आहे.

जळगाव : तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन त्याच महिन्यात निघायला पाहिजे म्हणून उच्चशिक्षण सहसंचालकांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून गेल्या मानधनाचे प्रस्ताव दि. ४ सप्टेंबरपर्यंत सादर करावेत, असे कळवले होते. त्याला खान्देशातून केवळ १० महाविद्यालयांनी प्रतिसाद दिला आहे.

तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांना नऊ महिन्यांसाठी नियुक्ती मिळते. प्रत्यक्षात मात्र परीक्षा आणि वेगवेगळ्या सुट्यांचा कालावधी वजा जाता पाच महिन्यांचे मानधन त्यांच्या हातात येते. मात्र तेही नियमित नसते. या मानधनाचे प्रस्ताव महाविद्यालयांकडून उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे पाठवले जातात. त्यामध्ये विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एप्रिल २०२३ मध्ये उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी महाविद्यालयांना पत्र पाठवून दर महिन्याच्या २ तारखेला मानधनाचे प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात सादर करावेत, असे कळवले होते. मानधनाचे प्रस्ताव वेळेत न येणे, त्यात त्रुटी असणे आदी अनेक मुद्दे यामध्ये आढळून आले होत्या.

खान्देशात ८२ महाविद्यालयेदरम्यान, जुलै व ऑगस्ट महिन्याचे शिक्षकांचे मानधन थकित आहे. त्याचे प्रस्ताव दि. ४ सप्टेंबरपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, खान्देशातील अनेक महाविद्यालयांनी उच्च शिक्षण सहसंचालकांच्या पत्राची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत नाही. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ८२ अनुदानित महाविद्यालये आहेत. त्यापैकी केवळ १० महाविद्यालयांनी वेळेत प्रस्ताव सादर केले आहेत.

वेळापत्रकाचे काय ?तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीसाठी १७ ऑक्टोबर २०२२ च्या अध्यादेशानुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. कार्यभार तपासणी, ना-हरकत प्रमाणपत्र मागणी, ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करणे, जाहिरात प्रसिद्ध करणे, अर्ज तपासणी, मुलाखत, उमेदवाराची निवड, नेमणूक आदेश देणे, विद्यापीठ मान्यता, तासिका तत्वावरील अध्यापकाची सेवा उपलब्ध करून देणे ही सर्व कार्यवाही १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत पूर्ण करायची आहे. या वेळापत्रकाचे पालन झाले असते तर मानधन वेळेत निघाले असते, असा दावा प्राध्यापक संघटना करत आहे.

अधिकारी म्हणतात... तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन त्याच महिन्यात निघावे म्हणून महाविद्यालयांनी मानधनाचे प्रस्ताव दर महिन्याच्या २ तारखेला सादर करावेत, असे प्राचार्यांना कळवले होते. सप्टेंबर महिन्यात मागील प्रस्तावांसाठी दि. ४ पर्यंतची मुदत होती. या मुदतीत १० महाविद्यालयांचे प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण सहसंचालक संतोष चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगावcollegeमहाविद्यालय