जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेतून शाळांसाठी वर्ग खोल्या बांधण्याचे काम यंदा मोठ्या जोमाने हाती घेण्यात आले.त्यात जि.प.च्या शाळांमध्ये संरक्षक भिंतीची कामे करण्यात आली. मात्र त्यासोबतच शाळांचे डिजिटायजेशन, अद्ययावत लॅब आणि त्यांची सामुग्री उभी करणे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत निधी नसतो. त्यासाठी आमदार निधी किंवा शिक्षण विभागाच्या इतर योजनांच्या माध्यमातून निधी उभारला जात असल्याची माहिती नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या शाळांचे संगणकीकरण किंवा अन्य बाबींपेक्षा संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला वेग दिला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत कधीच निधी दिला जात नाही. त्याऐवजी शाळांना आमदार निधी तसेच इतर योजनांमधून निधी पुरविला जातो.