चाळीसगाव : संतती नियमनाच्या वेगवेगळ्या पद्धती याविषयी माहिती व त्यांच्याशी निगडीत शंकाचे निरसन होऊन यावर व्यापक मंथन करण्यासाठी राज्य आणि चाळीसगाव स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ७ रोजी 'सुलभ संतती नियमनाचे विविध प्रकार' या विषयावर खुले चर्चासत्र आयोजित केले आहे. राजपूत लोकमंगल कार्यालयात दुपारी चार ते सहा या वेळात हे चर्चासत्र होईल.यात महिला व पुरुष यांना सहभागी होता येणार असून, नाशिक येथील डॉ. वर्षा बस्ते आणि मालेगाव येथील डॉ. शशिकांत वावळ हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.नवविवाहीत जोडप्यांसाठी संतती नियम, आंतरगर्भीय संतती नियमन पद्धती, इंजनेशनव्दारे संततीनियमन, भारुड चित्रीकरण, गर्भनिरोधक गोळ्या, बाळंतपणानंतरच्या संतती नियमनाच्या पद्धती, स्त्री - पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, कुटुंब कल्याण, बेटी बचाओ बेटी पढाओ आदी विषयांवर खुली चर्चा करण्यात येईल. यावेळी शंकांचे निरसनही केले जाईल.चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. उज्वला देवरे करतील. त्यांच्यासोबत शहरातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुभाष निकुंभ, डॉ. जयवंत देवरे, डॉ. संजय चव्हाण, डॉ. विनोद कोतकर, डॉ. यशवंत पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बी.पी. बाविस्कर, डॉ. अजय वाबळे, डॉ. मंदार करंबेळकर, डॉ. झोपे आदी सहभाग घेतील. उपस्थितीचे आवाहन संघटनेच्या अध्यक्षा डॉ. उज्वला देवरे, सचिव डॉ. स्मिता मुंदडा, प्रकल्प प्रमुख डॉ. संजय चव्हाण, कोषाध्यक्ष डॉ. योगेश पाटील यांनी केले आहे.
चाळीसगावला रविवारी सुलभ संतती नियमनावर खुली चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 3:34 PM
चाळीसगाव : संतती नियमनाच्या वेगवेगळ्या पद्धती याविषयी माहिती व त्यांच्याशी निगडीत शंकाचे निरसन होऊन यावर व्यापक मंथन करण्यासाठी राज्य आणि चाळीसगाव स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ७ रोजी 'सुलभ संतती नियमनाचे विविध प्रकार' या विषयावर खुले चर्चासत्र आयोजित केले आहे. राजपूत लोकमंगल कार्यालयात दुपारी चार ते सहा या वेळात हे ...
ठळक मुद्देस्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेचा उपक्रमडॉ. वर्षा बस्ते, डॉ. शशिकांत वावळ करणार मार्गदर्शन