कासोदा : वसंत साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत नवीन ऑक्सिजन प्लांटची उभारणी करावी. यामुळे येथील उपलब्ध साधनांचा वापर होऊ शकेल. कोरोनाच्या संभाव्य परिस्थितीत राज्याची ऑक्सिजनची गरज भागवावी व यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पिंपळभैरव पुलामुळे
वाहतूक सुरू होणार
अमळनेर : विधानसभा मतदारसंघातील शिरसोदे -महाळपूर गावासाठी पाणीटंचाई दूर करण्यासाठी तसेच शेती व सिंचनाकरिता दोन गेटेड बंधाऱ्यांचे भूमिपूजन नुकतेच झाले. पावसाळ्यामध्ये गावकऱ्यांना पारोळा जाण्यासाठी मार्ग राहात नव्हता आता पिंपळभैरव येथे पुलामुळे वाहतूक सुरू होईल.
चोसाकाने एकरकमी
पैसे भरावेत
चोपडा : चोपडा साखर कारखाना आता भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. बुलढाणा अर्बन सोसायटीचे कारखान्याकडे २४ कोटी २९ लाख ४९ हजार रुपये मुद्दल कर्ज घेणे आहे. या कर्जावर व्याजात तडजोड करून बारामती ॲग्रोने एकरकमी पैसे भरल्यास हा कारखाना भाडेतत्त्वावर दिला जाऊ शकतो, अशी स्थिती आहे.