भुसावळ : ऑनलाइन तिकिटांचे बुकिंग करून त्यांची काळ्या बाजारात विक्री करणा:या शहरातील आरपीडी रोडवरील स्टार सिटी ऑनलाइन सव्र्हिसेसच्या मो़ हुसेन शेर मोहम्मद (वय 28, भुसावळ) यास अटक करण्यात आली़ आरोपीकडून सुमारे 25 हजारांची आरक्षित तिकिटे जप्त करण्यात आली़मुंबईच्या मुख्य सतर्कता पथकाने (व्हिजिलन्स) स्थानिक आरपीएफ व आरपीएफ गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केली़ या कारवाईने तिकिटांचा काळाबाजार करणा:या वतरुळात मोठी खळबळ उडाली आह़ेमुंबईचे मुख्य सतर्कता निरीक्षक अतुल धीरसागर यांना प्राप्त झालेल्या तक्रारी व गुप्त माहितीनंतर शुक्रवारी रात्री सापळा रचण्यात आला़ आरपीएफ निरीक्षक व्ही़क़े लांजीवार, आरपीएफ गुन्हे शोध शाखेचे अतुल टोके यांच्या मदतीने आरोपीच्या आरपीडी रोडवरील स्टार सिटी ऑनलाइन सव्र्हिसेसवर धाड टाकून संगणक व मुंबई, उत्तर प्रदेशासह बिहारातील विविध ठिकाणांची स्लीपर व वातानुकूलित डब्यातील सुमारे 25 हजारांची 15 तिकिटे जप्त करण्यात आली़ आरपीएफ वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आऱपी़ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़स्वत:च्या नावाने केले आरक्षणसंशयित आरोपी आपल्याच नावाने तिकिटे बुक करीत होता तर बुक केलेली तिकिटे कन्फर्म झाल्यानंतर ग्राहकांना तिकिटाच्या डबल भावाने विक्री करीत असल्याची तक्रार पथकाला मुंबईत प्राप्त झाली होती़ रात्री उशिरा आरोपीविरुद्ध रेल्वे कायदा कलम 143 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ एका मिनिटात रिझव्रेशनसूत्रांच्या माहितीनुसार आरोपी संगणकात विशिष्ट सॉप्टवेअर वापरून ऑनलाईने तिकीटे बुक करायचा त्यामुळे एका मिनिटात त्याला आरक्षित तिकीट उपलब्ध व्हायच़े विविध गाडय़ांना नेहमीच असणा:या हाऊसफुल्ल रिझव्रेशनमुळे पथकाने लक्ष केंद्रीत करून कारवाई केली़आयपी अॅड्रेस ट्रेसव्हिजिलन्सने आरोपीच्या संगणकाचा आयपी अॅड्रेस तज्ज्ञांकडून ट्रेस करीत भुसावळ गाठत आरोपीला अटक केली़ संगणक हा महत्त्वाचा पुरावा ठरणार असून त्यातून अनेक गुपिते बाहेर पडणार आहेत़ केवळ भुसावळच नव्हे ठिकठिकाणी ऑनलाईन तिकीटांची काळाबाजारी करणारे व्हिजिलन्सच्या रडारवर असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़संगणक हाच पुरावाव्हीजीलन्सच्या अधिका:यांनी सांगितले की, आमच्यासाठी संगणक हाच मोठा पुरावा ठरणार आह़े आतार्पयत संशयीताने किती स्वत:च्या नावाने रिझव्र्हेशन करून ग्राहकांना तिकीटांची विक्री केली याबाबतची माहिती तपासात उघड होणार आह़े जिल्ह्यातील ऑनलाइन तिकीट विक्रेते रडारवर4संगणकाचा आधार घेत बंदी असलेले विशिष्ट सॉप्टवेअर वापरून ऑनलाईन तिकीटांचा काळाबाजार करणारे तिकीट विक्रेते मुंबई व्हिजीलन्सच्या रडारवर आहेत़ संगणक तज्ज्ञांनी त्यासाठी आयपी अॅड्रेस ट्रेस केले असून लवकरच कारवाई होईल, असे सूत्रांनी सांगितल़ेपाच वर्ष शिक्षा व दहा हजार रुपये दंड4रेल्वे अॅक्ट 143 मध्ये पाच वर्ष शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची तरतूद आह़े रेल्वे सुरक्षा बलाने त्यादृष्टीने आरोपीकडील संगणक, प्रिंटर व 25 हजार रुपये किंमतीची 15 आरक्षित प्रवासाची तिकीटे जप्त केली आहेत़ आरपीडी रोडवर आरोपीचे स्व: मालकीचे दुकान होत़े
ऑनलाइन तिकिटांचा काळाबाजार उघड
By admin | Published: February 18, 2017 12:33 AM