ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.19 - जिल्हाधिका:यांनी वाळू व्यावसायिक सागर मोतीलाल चौधरी (वय-29, रा़ चौघुले प्लॉट, शनिपेठ) याच्यावरील एमपीडीएच्या कारवाईचे आदेश मंगळवारी काढले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने त्याला दुपारी अटक करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेने दुपारी 2़45 वाजता शनिपेठ येथील राहत्या घरून सागर चौधरीला अटक केली़
त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात भाग 5, गुरनं 141/2015 कलम 354 विनयभंग, जिल्हा पेठ पोलिसात अत्यावश्यक वस्तू कायदा कलम अधिनियमाखाली गुरनं 35/2006, 12/2006 व अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. अवैधपणे वाळूचोरी बाबत त्याच्यावर चार वेळा दंडात्मक कारवाई एकूण 20 हजार 600 रुपये दंड वसूल केला आह़े शासकीय अधिका:याविरूध्द विनाकारण अर्ज करून त्यांना जेरीस आणणे अशा त्याच्या कृत्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता़