निंभोरा, ता.रावेर : येथील रेल्वे गेटवर उड्डाण पूल मंजुर करण्यात आला आहे. पूल उभारण्याच्या जागेत सुमारे शंभर कुटुंबांची जागा जात असल्याने रहिवास्यांनी या उड्डाण पूलास विरोध करून पर्यायी जागेची व पूल अन्यत्र हलविण्याची मागणी सार्वजनिक प प्रशासनाकडे केली आहे जुन्या विश्रामगृहात सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभाग, उड्डाण पुलामुळे बाधित होणारे जागा मालक,रहिवासी,भाड़ेकरु,दुकानदार,आदीची संयुक्त बैठक उपअभियंता इमरान शेख, शाखा अभियंता तायड़े यांच्या उपस्थितीत पार पड़ली. प्रसंगी संभावित खिर्डी रोड शवरील निभोरा गावा जवळ लेव्हल क्रासिंग(रेल्वे गेट)क्र 169 च्या जागेवर उड्डाण पूल केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. पुलासाठी निभोरा येथील सुमारे चाळीस जागा मालका कडून हरकती मागविल्या होत्या यावेळी बेघर होणा:या रहिवाशांनी पूल उभारणीस कडाडून विरोध केला आहे. दरम्यान उड्डाण पूला मुळे सुमारे दोनशे कुटुंब बेघर होत असून अनेकांची दुकाने, शेती, प्लॉट जात आहेत. यात अनेक हातमजुर पन्नास वर्षा पासुन पोटभाड़े करू आहे या पुलामुळे पोटभाड़े यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही. पर्यायी जागा सुद्धा मिळत नसल्याने पुलाला कडाडून विरोध केला आहे . बैठकीत पोटभाडे करुंनी पर्यायी जागा देऊन घर बांधून द्या अन्यथा आमचा संसार उघडय़ावर येईल उड्डाण पूल बलवाडी येथील रेल्वे गेवर बांधावा ज्यामुळे एकाही कुटुंबाचे घर जाणार नाहीत. दुकानेही जाणार नाही व गेट वरुन खिर्डी रस्ता सुद्धा होईल व नागपूर महामार्ग जवळ पडेल,असे मत मांडले. राष्ट्रवादी कॉग्रेसचे सुनील कोंडे यांनी रहिवाशाची बाजू मांडली अनिल चौधरी, भगवान महाजन, अशोक चौधरी, नीरज पाटिल,अनिल चौधरी, प्रवीण पाटील, दीपक चौधरी, सुभाष जोशी,अनिल कोंडे,प्रफुल्ल पाटील प्रभाकर पाटील, नितिन पाटील, काशिनाथ बोरसे,राजू बोरसे, सचिन गुल्लानी,मोहन राठौड़, मनीषा जोशी, सुरेश बोरसे,राजेंद्र मिस्तरी, ज्ञानेश्वर महाजन, सागर चौधरी उपस्थित होते.केंद्र सरकारने निभोरा येथे रेल्वे येथे उड्डाणपूल मंजूर केला आहे. पुलाची माहिती देण्यासाठी सर्व रहविास्यांची बैठक घेण्यात आली.आवश्यक भूसंपादना संदर्भात माहिती घेऊन वरिष्ठानकडे पाठविणार आहे. नुकसान भरपाई अथवा पयार्यी जागा देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल.- इमरान शेख, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,रावेर.होणा:या उड्डाण पुलाच्या येणा:या जागेत आमची खाजगी दुकाने,रहिवास आहे. नागरीवस्ती मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे येथे मोठी अडचण निर्माण होईल. पर्याय म्हणून हा पूल बलवाडी रेल्वे गेट वर हलवावा. -अनिल चौधरी, उड्डाणपूल बाधीत रहिवासी, निंभोरा,ता.रावेर.
रेल्वे उड्डाणपुलाला स्थानिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2017 12:25 AM