जळगाव : नुकत्याच संसदेत पारित करण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात चाळीसगाव व एरंडोल येथे मोर्चा काढण्यात आला. तर अमळनेरात विविध संघटनांनी विधेयकाचे समर्थन केले आहे. यावेळी या शहरांमध्ये बहुसंख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.या कायद्याच्या अपूर्ण माहितीमुळे देशात सर्वत्र मोर्चे, दंगल, हाणामाऱ्या आदी चिंताजनक प्रकार घडत आहेत. हा कायदा कसा योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी तसेच याविषयी गैरसमज दूर करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे अमळनेरच्या आयोजकांनी सांगितले.
एरंडोल येथे मुस्लीम मंचतर्फे मूक मोर्चाएरंडोल : नागरिकत्व संशोधन कायदा २०१९ रद्द करावा या मागणीसाठी २३ रोजी एरंडोल मुस्लीम मंचतर्फे भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. सकाळी दहा वाजता बाखरूम बुवा दर्ग्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. अत्यंत शांततेने व शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चाचे आयोजन करण्यात येऊन तहसीलदार खेतमाळीस यांना निवेदन दिले. पोलीस उपविभागीय अधिकारी ससाने पोलीस निरीक्षक अरुण हजारे, एपीआय तुषार देवरे यांच्यासह सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.
चाळीसगावला शांतता राखत मूक मोर्चा ;राष्ट्रवादीसह अनेक संघटनांचा सहभागचाळीसगाव : येथे सोमवारी मुस्लिम बांधवांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले. सकाळी १० वाजता घाटरोडस्थित जामा मशिदीपासून मोर्चाला सुरुवात झाली. नायब तहसिलदारांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली. राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांसह अनेक संघटनांनी देखील सहभाग दिला. हजारो नागरिकांचा सहभाग असलेला आणि शांतपणे मार्गक्रम करणा-या मूक मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.४सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभर असंतोष पसरत असतानाच येथेही लविविध संघटनांनी मूक मोर्चा काढून कायद्याचा निषेध नोंदवला. घाटरोडस्थित जामा मशिद परिसरात सकाळपासूनच मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती.४विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोर्चात सहभागी झाले होते.शांतता राखत मूक मोर्चाला सुरुवात झाली. घाटरोडवरुन निघलेला मोर्चा हॉटेल दयानंद मार्गाने तहसिल कार्यालयाच्या परिसरात आला. यावेळी नायब तहसिलदार नानासाहेब आगळे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.४भारत हा सर्वधर्मसमभाव या तत्त्वाचा आदर करणारा देश असून सुधारीत नागरिकत्व कायद्याने याला छेद दिला गेला आहे. संविधानाचा देखील यामुळे अवमान झाला आहे. अनेक धर्मांवर या कायद्याने अन्याय होणार आहे. त्यामुळे हा कायदा त्वरीत रद्द करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.४मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी गफूर पहिलवान, अल्लाउद्दीन शेख, फकिरा मिर्झा, दिलावर मेंबर यांच्या प्रमुख उपस्थित निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, नगरसेवक आनंदा कोळी, रामचंद्र जाधव, भगवान पाटील, चिराग शेख, शेखर देशमुख, रोशन जाधव, धर्मभूषण बागूल, बहुजन वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष संभाजी जाधव, रवींद्र जाधव आदी सहभागी झाले होते. मोर्चाला बहुजन क्रांती मोर्चा, संभाजी सेना यांनीही पाठिंबा दिला होता.
लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर : येथे नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी जल्लोषपूर्ण मोर्चा काढला. तहसील कचेरीजवळ मोर्र्चाचे रूपांतर सभेत झाले.मोर्चाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार वाहून करण्यात आली. त्यानंतर मोर्चा तेथून सुभाष चौक, बाजार पेठ, पन्नालाल चौकामार्गे बस स्टँड कडून तहसील कार्यालयात आला. मोर्चेकऱ्यांनी मोर्चा मार्गावर भारत माता की जयची जोरदार घोषणाबाजी केली. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थांनी कायद्याला समर्थनपर भाषणे दिली. राष्ट्रगीतही म्हणण्यात आले. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले.स्मिता वाघ यांचा सहभागयावेळी आमदार स्मिता वाघ,माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, भाजपचे कोषाध्यक्ष लालचंद सैनानी, जेष्ठ नेते बजरंग अग्रवाल, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, पं. स. चे माजी सभापती डॉ. दीपक पाटील, माजी उपसभापती श्याम अहिरे, खा. शि. मंडळाचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, संचालक नीरज अग्रवाल, योगेश मुंदडे, जितेंद्र जैन,अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, बाजार समितीचे संचालक पराग पाटील, भाजपचे माजी शहराध्यक्ष अजय केले, हरचंद लांडगे, शीतल देशमुख , उमेश वाल्हे, कैलास भावसार, प्रा. धीरज वैष्णव, सिनेट सदस्य दिनेश नाईक, पंडित नाईक, दत्ता नाईक, प्रा.डॉ. पी. आर. भावसार, नरेंद्र निकुंभ, प्रा. डी. आर .चौधरी, सुनील भोई, गौरव माळी, पंकज भोई, मनोज शिंगाणे, अभिषेक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक नागरिक उपस्थित होते.