भुसावळ, जि.जळगाव : कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या शहरातील लाल बिल्डिंगजवळ प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेट्स लावण्यास परिसरातील नागरिकांनी विरोध केला. यामुळे शहरातील उस्मानिया कॉलनी, पटेल कॉलनी, अन्सारउल्ला कॉलनी येथील ६० ते ७० जणांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात कोरोनाने कहर केला आहे. लाल बिल्डिंग, जाम मोहल्ला, खडका रोड या परिसरातही कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहे. त्यामुळे लाल बिल्डिंग परिसरात, खडका रोडवर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच मंडप व बॅरिकेटिंग कॉन्ट्रॅक्टर यांनी शासकीय आदेशाप्रमाणे ५ जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास बॅरिकेट लावण्याचे काम सुरू केले होते. मात्र या कामात उस्मानिया कॉलनी, पटेल कॉलनी, अन्सारउल्ला कॉलनी येथील आसिफखान हबीबखान, एहसान डॉक्टर, नसीम बागवान, मुस्ताकीन बागवान, बाबा टीचर, रिजवान पीओपीवाला, जाकीर बागवान, मुजम्मिल असिफ, रिजवान खान, नासिर खान, तोसिफ बागवान, गुड्डू बागवान यांच्यासह साठ-सत्तर लोकांनी विरोध केला.या लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. यातील आसिफखान हबीबखान यास अटक करण्यात आली आहे.
भुसावळात प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेटस लावण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:08 PM
प्रतिबंधित क्षेत्रात बॅरिकेट्स लावण्यास परिसरातील नागरिकांनी विरोध केला. यामुळे बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देभुसावळ येथील लाल बिल्डींगजवळील रात्रीची घटना६०-७० जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल