ऑनलाईन लोकमत
बोदवड,दि.13 - शहरातील दारु दुकानाला विरोध करण्यासाठी गुरुवारी ग्रामस्थांतर्फे मोर्चा काढत दिवसभर लाक्षणीक उपोषण करण्यात आले.
दोन महिन्यापूर्वी सर्वोच्च आदेशानंतर बोदवड नगरपंचायतीने शहरातील मनुर रस्ता या रहिवासी प्रभाग क्र.13 मध्ये दारु दुकानाला नाहरकत दिली होती. दुकान सुरु झाल्यानंतर प्रभाग क्र.13, 16 व 17 मधील महिलांनी 11 मे रोजी नगरपंचातयीवर मोर्चा काढला होता.
त्यानंतर सर्व नगरसेवकांनी एकत्र येत दारु दुकान बंदचा ठराव पास केला होता. त्याची प्रत राज्य उत्पादन शुल्क विभागाला देत दारु दुकान बंदची मागणी केली होती. बोदवड शहरात प्रभाग क्रमांक सहामध्ये तसेच मलकापूर रस्त्याने ही खुलेआम दारुची अवैध विक्री सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलीस काहीच करत नसल्याने संतप्त महिलांनी प्रभाग क्र.13 मधील दारु दुकान व दारु विक्री बंद करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 13 रोजी सकाळी 11 वाजता मोर्चा काढून लाक्षणिक उपोषण केले.
स्वामी विवेकानंद ते तहसील कार्यालयार्पयत मोर्चा काढण्यात आला व एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. उपोषणात देवकाबाई माळी, मनीषा कोळी, कुसूमबाई सूर्यवंशी, अनिता कोळी, सुनंदा कोळी, सुनिता माळी, संगिताबाई कोल्हे, नंदाबाई माळी, हसनूर बी शेख, जैनबबी, शांताराम कोळी, भास्कर गुरचळ, प्रवीण कोल्हे, हसन ठेकेदार, महेबूब शेख, हसन अली, पटवे, राजू मुलतानी, चाँद खा हैदर खांॅ, अशोक सोनवणे, कैलास भोई, श्रीपत माळी आदी उपोषणाला बसले होते.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आढाव यांची प्रतिक्रिया घेतली असता चौकशी सुरू असून उपोषणकत्र्याना भेटण्यासाठी पथक पाठवले आहे असे सांगितले.