मोहन सारस्वत जामनेर : राज्य सरकारचे ‘संकटमोचक’अशी प्रतिमा असलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील लढत राज्यातील चुरशीच्या लढतीपैकी एक व्हावी, असा विरोधकांचा प्रयत्न आहे. महाजन यांना कोंडीत पकडण्यासाठी यंदा स्थानिक विरोधकांना राज्यातील नेत्यांची सर्व प्रकारची मदत मिळणार आहे.
१९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले महाजन आता सलग सहाव्यांदा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीने कधी स्वतंत्र तर कधी आघाडी करून त्यांच्या विरोधात उमेदवार दिला. २०१४ मध्ये कॉँग्रेसकडून संजय गरुड व डिगंबर पाटील इच्छुक असताना पक्षाने ज्योत्स्ना विसपुते यांना उमेदवारी दिल्याने गरुड व पाटील यांनी कॉँग्रेस सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ ‘हाता’वर बांधले. पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने तिरंगी लढतीत महाजन पाचव्यांदा निवडून आले. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जामनेर नगरपरिषद निवडणुकीत सर्व जागा भाजपने जिंकल्या तर संजय गरुड यांच्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीतही भाजपने बहुमत मिळविले. महाजन यांचा करिष्मा दिसून आला.
भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश पाहता जिल्ह्यातील सर्वच जागांवर विजयाचा दावा महाजन यांच्याकडून केला जात आहे. राज्यातील विरोधी पक्ष संपवायला निघालेल्या महाजन यांच्या मतदारसंघातील विरोधक आक्रमक असल्याने लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ खडसे मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर पक्षात महाजन यांचे वजन वाढले. विरोधकांना आपलेसे करून त्यांना भाजपत घेण्यात हातखंडा असल्याने इनकमिंगचे प्रणेते संबोधले जाते. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्राची धुरा त्यांच्याकडे असल्याने त्यांना आपल्या मतदारसंघाकडे लक्ष देता आले नाही, परिणामी शहरातून भाजपला अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही. अल्पसंख्य समाज काही अंशी दुरावल्याने त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न गेल्या तीन महिन्यात झाला.पाच वर्षात काय घडले?
- टेक्सटाईल पार्कच्या कामास गती
- वाघूर धरणावरील उपसा सिंचन योजना पूर्णत्वाकडे
- सुगंधी वनस्पती संशोधन केंद्रासाठी ५० एकर जागा उपलब्ध
- तालुक्यात पक्के डांबरी रस्त्यांचे जाळे, ४८ कोटींच्या कामांना सुरुवात
- दोन नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी
- पहूर, शेंदुणीसाठी वाघूर धरणातून पाणीपुरवठा योजनेला मंजुरी
गिरीश महाजन यांना जलसंपदा हे महत्त्वाचे खाते मिळूनदेखील तालुक्यातील १३५ गावातील नागरिक गेल्या वर्षी तहानलेलेच राहिले. टेक्सटाईल पार्कच्या नावे फसवणूक केली. -संजय गरुड, नेते, राष्ट्रवादीसंभाव्य प्रतिस्पर्धीसंजय गरुड, अभिषेक पाटील, बंगालीसिंग चितोडिया, अॅड.ज्ञानेश्वर बोरसे (राष्ट्रवादी)शंकर राजपूत,शरद पाटील (काँग्रेस)डॉ.मनोहर पाटील, दीपक राजपूत (शिवसेना)