बोदवड : राज्यात सुरू असलेले चिल्ड वॉटर प्लँट बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. त्यानुसार, बोदवड येथील आठ प्लँटधारकांना नगरपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दाखल केलेल्या याचिकेच्या निकालानुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रात चिल्ड वॉटर सप्लायच्या नावाखाली बंद जार, कॅनमध्ये सर्रासपणे घरोघर तसेच कार्यालय व लग्न समारंभ या ठिकाणी विकले जाणाऱ्या थंड पाण्याचे जार हे अन्न भेसळ प्रशासन तसेच गुणवत्ता निरीक्षण त्याचप्रमाणे पाण्याचे पेस्ट कंट्रोल व प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या सुरू आहे.या सर्व प्लँटना बंद करण्याचे आदेश उपसंचालक, महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांनी राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका, नगरपंचायतींना काढले आहे.त्या अनुषंगाने बोदवड शहरात असलेल्या आठ वॉटर प्लँटधारकांना येत्या तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. वॉटर प्लँटचालकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी तसेच अन्न भेसळ प्रशासनाची परवानगी, पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या असल्यास तीन दिवसात सादर कराव्या अन्यथा हे प्लँट सुरू असल्यास सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या आशयाचे पत्र नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी २ रोजी प्रसिद्ध केले आहे. परंतु आजही हे प्लँट कागदपत्रे सादर न करता बिनदिक्कत सुरू आहेत. काही प्लँट हे राजकीय पदाधिकारी तसेच पुढारी यांच्या पुत्राच्या मालकीचे असून, यातील एकाकडेही परवानगी नाही.त्याचप्रमाणे त्यावर वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहनेही जीर्ण झालेली आहेत.याबाबत नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाचे अधिकारी अमित कोलते यांची प्रतिक्रिया घेतली असता सर्व प्लांटधारकांना नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चिल्ड वॉटर प्लँट बंद करण्याचे आदेश- बोदवड येथील आठ प्लँटधारकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 21:15 IST
बोदवड येथील आठ प्लँटधारकांना नगरपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत.
चिल्ड वॉटर प्लँट बंद करण्याचे आदेश- बोदवड येथील आठ प्लँटधारकांना नोटिसा
ठळक मुद्दे बोदवड येथील आठ प्लँटधारकांना नगरपंचायतीने नोटिसा दूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या सुरू