जळगाव -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयात सुरु असलेले सर्व खाजगी क्लासेस, टयुशन्स, अभ्यासिका ३१ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी सोमवारी दिले.प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना, दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय वगळून ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश असून त्याचबरोबरया आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेकडून उल्लंघन, अवज्ञा केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.