गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : पोषण आहार उकिरड्यावर फेकल्याप्रकरणी एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांनी सोमवारी बोदवड येथे भेट देवून पोषण आहाराची तपासणी केली. त्यात बालकांना द्यावयाची अन्नाची ३८ पाकिटे कमी भरली. यामुळे या ३८ अन्न पाकिटांचा दंड भरण्याचे आदेश एकात्मिक बालविकास अधिकाºयांनी दोघा अंगणवाडी सेविकांना दिले.बोदवड शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीच्या मागे उकिरड्यावर अंगणवाडीतील शंभरावर अन्नाची पाकिटे फेकलेली आढळली होती. ही अन्न पाकिटे अंगणवाडीतील बालकांना वजन व उंची वाढविण्यासाठी पूरक पोषण आहार म्हणून दिली जातात.उकिरड्यावर फेकलेल्या या अन्नपाकिटांचे व्हीडिओ चित्रीकरण तसेच सविस्तर वृत्त ‘लोकमत’च्या १२ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले होेते. याची दखल घेत एकात्मिक बालविकास अधिकारी दमयंती इंगळे यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी तसेच अंगणवाडीतही भेट दिली.यासंदर्भात दमयंती इंगळे यांनी अंगणवाडीसेविकांकडून खुलासा मागितला होता. यात अंगणवाडीसेविकांनी पोषण आहाराच्या पाकिटांची चोरी झाल्याचे म्हटले होते.इंगळे यांनी अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाºया पोषण आहाराचे रजिस्टर आणि पोषण आहाराची शिल्लक पाकिटे तपासली. त्यात नोंदीपेक्षा ३८ अन्न पाकिटांची तफावत आढळली. एका अन्न पाकिटाचे वज ९३ ग्रॅम आहे. तफावत आढळलेल्या या ३८ अन्न पाकिटांची रक्कम दंड म्हणून भरण्याचे आदेश मनीषा एस.बडगे व सुरेखा के.फाटे या दोघा अंगणवाडी सेविकांना दिले आहेत.यासंबंधीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याचे एकात्मिक बालविकास अधिकारी दमयंती इंगळे यांनी ‘लोकमत’ला माहिती दोतना सांगितले.
३८ अन्न पाकिटांचा दंड भरण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 7:27 PM
पोषण आहार उकिरड्यावर फेकल्याप्रकरणी एकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांनी सोमवारी बोदवड येथे भेट देवून पोषण आहाराची तपासणी केली. त्यात बालकांना द्यावयाची अन्नाची ३८ पाकिटे कमी भरली.
ठळक मुद्देबोदवड : अन्नपाकिटे उकिरड्यावर फेकल्याप्रकरणी चौकशी‘लोकमत’च्या वृत्ताचा प्रभावएकात्मिक बालविकास अधिकाऱ्यांकडून उकिरडा व अंगणवाडीत पाहणी