शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दीपनगरातील बंद संच सुरू करण्याचे आदेश

By admin | Published: February 15, 2017 12:26 AM

राज्यातील विजेची मागणी वाढली : संच क्रमांक तीनमधून बुधवारपासून वीजनिर्मिती

भुसावळ : महाजेनकोच्या  दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील सुमारे सहा-सात महिन्यांपासून बंद असलेला संच क्रमांक तीन तातडीने कार्यान्वित करून त्यातून वीजनिर्मिती करण्याचे आदेश शासनाच्या महावीज वितरण कंपनीकडून मंगळवारी प्राप्त झाले, अशी माहिती दीपनगर वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी दिली.दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील बंद असलेले 210 मेगाव्ॉट क्षमतेचे दोन्ही संच वीजनिर्मितीसाठी सज्ज ठेवण्यात आले होते.   महावीज निर्मितीकडील  आदेशाची प्रतीक्षा होती. मंगळवारी महावीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून संच सुरू करण्याचे आदेश आले आहेत असे हरणे यांनी सांगितले.दरम्यान, तापमानात वाढ होत असल्याने राज्यातील विजेची मागणी सतत वाढत आहे. संच क्रमांक तीन हा आरएसडी स्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून होता.  शासनाच्या महावीज निर्मितीची वीज केंद्र आणि खासगी उद्योगांपेक्षा स्वस्त आहे. ती 2 रुपये 91 पैसे युनिट या दराने उपलब्ध असता आपण एनटीपीसीची वीज 3 रुपये 24 पैसे युनिट या दराने खरेदी करीत असल्याची स्थिती आहे.वहन होताना नुकसानदरम्यान, एनटीपीसीची वीज घेताना व तिचे वहन होताना सुमारे 30 ते 35 टक्के विजेचे नुकसान होत असल्याची  जाणकारांची माहिती आहे.स्थापित क्षमतामहावीज निर्मितीची दररोजची वीज निर्मितीची स्थापित क्षमता 11 हजार 500 मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रातील महाजेनकोची सात वीज निर्मिती केंद्र आणि जल, वायू आणि सौर ऊज्रेवरील सर्व वीजनिर्मिती प्रकल्प सुरू राहिल्यास महाराष्ट्रात स्वत:च्या मालकीची 11 हजार 500 मेगाव्ॉट वीज निर्मिती होऊ शकते. मात्र यासाठी सर्व संच सुरू असणे गरजेचे आहे.मुबलक पाण्याची सोयदीपनगर वीज निर्मिती केंद्रच मुळात तापीनदीच्या काठावर वसले आहे. पाण्याचा अहोरात्र स्त्रोत आहे. दीपनगरचा स्वत:चा बंधारा आहे शिवाय हे केंद्र आशिया महामार्गावर आहे. निवासांची सोय आहे. पुरेशा प्रमाणात कोळसा आहे. वीज केंद्रा र्पयत रेल्वे लाईनचे जाळे आहे आणि वीजेची मागणी आहे,असे असताना वीज निर्मिती संच बंद ठेवू नये,अशी भावना या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. वीज संच बंदमुळे     रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, अशीही कामगारांची भावना आहे.दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पावर सुमारे पाच हजार कुटुंबीयांचा चरितार्थ अवलंबून आहे. संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची गरज आहे.  (प्रतिनिधी)महावितरणकडून मिळाली सूचना4आरएसडी (रिझव्र्ह शटडाऊन) स्थितीत गेल्या सात-आठ महिन्यांपासून असलेला जुन्या प्रकल्पातील संच क्रमांक 3 तातडीने सुरू करण्याची सूचना मंगळवारी दीपनगर येथील प्रशासनाला प्राप्त झाली. त्यामुळे हा संच वीजनिर्मितीसाठी सुरू करण्यात आला. बुधवारी दुपारी 12 वाजेर्पयत या संचातून वीजनिर्मिती सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. आता हा संच कार्यान्वित करण्यात आला आहे.बुधवार्पयत तो सुरळीत होईल, असेही सूत्र म्हणाले.मंगळवारी राज्याची विजेची मागणी तब्बल 20 हजार  मेगाव्ॉट इतकी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  शासनाच्या महावीज निर्मितीची मंगळवारी  6 हजार 854 इतकी वीज निर्मिती होती. यात  खाजगी उद्योगांची  3 हजार 146 आणि केंद्राची (एनटीपीसी)  6 हजार 791 मेगाव्ॉट अशी वीज वापरुन महाराष्ट्राची विजेची मागणी पूर्ण केली जात आहे.2.75 लाख मे.टन कोळशाचा साठा.. दीपनगरातील नवीन प्रकल्पातील 500 मेगाव्ॉट क्षमतेच्या दोन्ही संचातून मंगळवारी 508 आणि 509 मेगाव्ॉट म्हणजे 117 मेगाव्ॉट वीजनिर्मिती सुरू आहे. दरम्यान, दीपनगर प्रशासनाकडे मंगळवारी 2.75 लाख मे.टन इतका कोळसा शिल्लक असल्याची माहिती दीपनगरातील अधिकृत सूत्रांनी दिली.दीपनगरातील संच क्रमांक तीन कार्यान्वित करण्याचा आदेश महावीज वितरणकडून प्राप्त झाला आहे. त्यानुसार हा संच सुरू करण्याची प्रक्रिया मंगळवारपासूनच सुरू करण्यात आली आहे. बुधवारपासून वीजनिर्मिती सुरू होईल. राज्यातील विजेची मागणी वाढली आहे.- अभय हरणे, मुख्य अभियंता, दीपनगर, वीजनिर्मिती केंद्र.