शहराबाहेर एमआयडीसी रस्त्यावर असलेले बीअरबार रात्री अकरा वाजेनंतरही सुरू होते. या मार्गावर दोन बार सुरू असल्याचे आढळले तर दोन्ही बारच्या बाहेर वाहनांची संख्या जास्त होती. काही ग्राहक बारच्या बाहेर सिगारेटचे झुरके घेत गप्पा मारत होते. एमआयडीसीतील एक बारही ११.२० वाजता सुरू असल्याचे दिसून आले.
२) भुसावळ रोड
भुसावळ रस्त्यावरही काही बार उशिरापर्यंत सुरू होेते. काही दिवसांपूर्वी ढाब्यावर रात्री मारहाण व पिस्तूल काढल्याचे प्रकरण घडले होते. त्या ढाब्यापासूनच काही अंतरावरील बार रात्री ११ नंतर नेहमीच सुरू असल्याचे या परिसरातील लोकांनी सांगितले. या बारचे बाहेरून शटर बंद होते.
१) बहिणाबाई उद्यान
मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बहिणाबाई उद्यानाच्या परिसरात महामार्गाला लागून असलेला बार रात्री ११.३० वाजता सुरू होता. या बारमध्ये बऱ्यापैकी ग्राहक होते. येथे मद्य प्राशन केल्यानंतर ग्राहक रस्त्यावर व उद्यानाच्या बाजूला थांबलेले होते. काही ठिकाणी मद्यपी गटागटाने उभे असतात.
२) भजे गल्ली
बसस्थानक व पोलीस अधीक्षक कार्यालयाला लागून असलेल्या भजे गल्लीत दोन बीअरबार रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होते. हे बार एक दिवसच नव्हे तर रोज उशिरापर्यंत सुरू असतात. उशिरापर्यंत मद्य प्राशन करायचे तर भजे गल्लीत चला..असे मद्यपी नेहमीच बोलत असतात, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतही ते आढळून आले.
५० टक्के क्षमतेसह बार सुरू करण्याचे आदेश
लॉकडाऊन काळात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. त्यात ५० टक्के क्षमतेसह बार सुरू करावेत. कोविडची लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच बारमध्ये प्रवेश देण्यात यावा. याची तपासणी करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळच थर्मल स्क्रिनिंगच्या साहाय्याने शरीरातील तापमानाची पातळी मोजावी. त्याशिवाय पल्स ऑक्सिमीटरच्या साहाय्याने तपासणी करावी. त्याआधी व नंतर बोट सॅनिटायझर करावे. ही पातळी ९५ पेक्षा कमी असलेल्या व तापमान ३८.० अंश सेल्सिअस (१००.४ एफ) जास्त किंवा फ्लूची लक्षणे असलेल्या ग्राहकांना परवानगी देऊ नये. ३१ जानेवारीपर्यंत हे आदेश आहेत.
कोट...
वाईनशॉपला रात्री १० तर बीअरबारला रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कोविडच्या संदर्भातील सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. देशी दारूचे दुकान सकाळी ८ वाजता सुरू करण्याची परवानगी आहे. ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊनचे आदेश आहेत.
-सीमा झावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग
बीअरबार
५२९
वाईनशॉप