जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेसाठी थांबविण्यात आलेली आरटीओतील कामे सुरु करण्याचे आदेश परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिले आहेत. दरम्यान, दैनंदिन कामे करताना प्रणालीवरील संगणक तसेच चाचणीसाठी वापरण्यात येणाºया वाहनांचे प्रत्येक व्यक्तीनंतर सॅनिटाझेशन करणे सक्तीचे करण्यात आले आहे. लॉकडाऊन कालावधीपर्यंत शिकाऊ परवाना जारी केलेले व मधल्या काळात ज्यांची वैधता संपली आहे, अशा शिकाऊ परवान्यांची मुदत ३० सप्टेबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व परिवहन कार्यालय व त्यांच्या अंतर्गत असणाºया शिबिर कार्यालयातील कामे वगळता उर्वरित सर्व कामे, अर्थात परवाना जारी करणे, परवाना दुय्यम करणे, परवान्याविषयक सर्व कामे, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहन विषयक सर्व कामे, परवाना विषयक कामे व वायु वेग पथकाच्या कामांचा समावेश आहे. शिकाऊ परवाना देताना २ अर्जदारांमध्ये ६ फुटाचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास लगेच संगणक सॅनिटाझेशन करावे, अर्जदारास मास्क व हॅण्डग्लोज घालूनच प्रवेश देण्यात यावा, कार्यालयात सॅनिटाझरचा पुरेसा साठा तयार ठेवावा यासह ड्रायव्हींग स्कुलचे वाहन तसेच योग्यता प्रमाणपत्रासाठीचे वाहन सॅनिटायझेशन करणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.
राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात जनेतेचे कामे सुरु करण्याचे आदेश, परवान्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 6:55 PM