ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24- अवघ्या एका दिवसावर आलेल्या नाताळ सणाचे सर्वत्र वेध लागले असून या निमित्त चर्चही सजले आहेत. प्रभू येशू ािस्त यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा होणा-या या सणाच्या पाश्र्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. पांडे डेअरी चौकातील अलायन्स चर्चमध्ये 22 डिसेंबरपासून कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. 24 रोजी सकाळी साडेनऊ वाजता व संध्याकाळी 7 वाजता उपासना होणार आहे. 25 रोजी सकाळी 9.30 वाजता नाताळची उपासना, संध्याकाळी साडेपाच नाताळ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 28 रोजी संध्याकाळी 7 वाजता तरु ण संघातर्फे कार्यक्रम, 29 रोजी दुपारी 2 वाजता खेळ, 30 रोजी संध्याकाळी 5 बायबल क्वीज, 31 रोजी सकाळी 9.30 वाजता उपासना, रात्री 8 ते 10 वाजेदरम्यान कॅप फायर, रात्री 10 ते 12 वाजेदरम्यान वॉच नाईट सर्विस (साक्ष व प्रार्थना), तर 1 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता नूतनवर्ष उपासना, प्रभू भोजन व अर्पण असे कार्यक्रम होणार आहे. या सोबतच रामानंद नगर रस्त्यावरील सेंट. फ्रॅन्सिस डी. सेल्स चर्च, मेहरुण तलाव परिसरातील सेंट थॉमस चर्चमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.